दिवाळीसाठी चेहऱ्यावर आणा ‘ग्लो’

दिवाळीसाठी चेहऱ्यावर आणा ‘ग्लो’

दिवाळीसाठी चेहऱ्यावर आणा 'ग्लो'

अनेकांना आपला चेहरा सुंदर दिसावा असे वाटत असते. विशेष म्हणजे सणावाराला अधिकच चेहरा सुंदर दिसण्याकरता अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात. तर काही जण पार्लरमध्ये जाऊन अनेक करतात. मात्र, जर तुम्हाला चेहरा घरच्या घरी सुंदर करायचा असेल तर काही घरगुती उपायांचा वापर तुम्ही सहजरित्या करु शकता.

साखर आणि लिंबू

१ चमचा साखर घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला चांगला ग्लो येण्यास मदत होईल.

संत्र्याची साल

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी संत्र्याची साल एक रामबाण उपाय आहे. यासाठी आपल्याला संत्रांच्या सालीला वाळवून त्याची पावडर करुन घ्या. ही तयार पावडर कच्च्या दुधात मिसळून आपण चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्याला चांगले स्क्रब होते.

तांदळाचे पीठ

तांदळाचे पीठ आणि दही समप्रमाण मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि हळुवार हाताने मॉलिश करा. नंतर थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

बेकिंग सोडा

चेहरा उजळण्यासाठी २ मोठे चमचे बेकिंग सोडा, १ लहान चमचा दालचिनी पूड, अर्धा लिंबाचा रस आणि मध मिसळून ही पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते.

First Published on: November 13, 2020 6:10 AM
Exit mobile version