घरच्या घरी असा बनवा रीठा शँम्पू

घरच्या घरी असा बनवा रीठा शँम्पू

बाजारात केमिकल युक्त शॅम्पू मिळतात. जे डँड्रफ, हेअर फॉल, ब्रेकेज, ऑइली स्कॅल्प सारख्या केसांसंबंधित समस्या दूर होतील असा दावा करतात. मात्र यामध्ये वापरले जाणारे केमिकल हे केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. अशातच आता असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, त्याऐवजी केसांना नक्की लावायचे काय?

परंतु तुम्हाला माहितेय का, घरच्या घरी तुम्ही आयुर्वेदिक शँम्पू तयार करू शकता. तो पूर्णपणे केमिकलविरहीत आणि सुरक्षित असेल. हाच शँम्पू केसांच्या स्कॅल्पसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे तुमचे केस जाड आणि मजबूत होऊ शकतात. त्याचसोबत नैसर्गिक रंग आणि चमक ही कायम राहू शकेल. घरच्या घरी रीठाचा शँम्पू कसा तयार कराल हे पाहूयात.

साहित्य-
रीठा
मेथी
एलोवेरा
जास्वंदीची पाने

कृती-
सर्वात प्रथम रीठा बारीक करून घ्या. तसेच एलोवेरा आणि मेथी सुद्धा बारीक करून घ्या. असे केल्यानंतर

एखाद्या कंटेनरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घ्या आणि त्यात रीठा टाका आणि तीन ते चार तास तो भिजू द्या. त्यानंतर आपल्या हातांनी तो व्यवस्थितीत चुरून धुवा.

आता गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवत त्यात रीठाचे पाणी घेऊन त्यात जास्वंदीची बारीक केलेली पाने, कापलेला एलोवेरा टाका. हे सर्व मिश्रण जवळजवळ 12-15 मिनिट पर्यंत शिजू द्या आणि उकळ येऊ द्या.

अशा प्रकारे तुमचा शँम्पू तयार. तो गाळणीने गाळून वेगळा एका कंटेनरमध्ये भरून ठेवा. जेव्हा तुम्ही तो वापराल तेव्हा मिक्सर ब्लेंडरमध्ये वाटून घेऊ शकता. जेणेकरुन त्याचा अधिक फेस येण्यास मदत होईल.


हेही वाचा- फक्त 20 रुपयांत घरीच बनवा केमिकल फ्री गुलाब जल

First Published on: September 8, 2023 3:06 PM
Exit mobile version