Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyफक्त 20 रुपयांत घरीच बनवा केमिकल फ्री गुलाब जल

फक्त 20 रुपयांत घरीच बनवा केमिकल फ्री गुलाब जल

Subscribe

गुलाब हे फूल आंतरराष्ट्रीय फूल म्हणून ओळखते जाते. गुलाबाचे फुल प्रेम, पवित्रता, विश्वास आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे. भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये शतकानुशतके गुलाबाचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो. यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरले जाणारे गुलाब जल त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. त्वचेतील घाण बाहेर काढून त्वचा उजळवण्यासाठी गुलाब जलचा वापर केला जातो.

घरीच बनवा गुलाब जल

Organic rose water- Its uses & benefits that will make you buy it ASAP

- Advertisement -

 

साहित्य :
  • 2 वाटी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या
  • 3 ग्लास पाणी
  • लोखंडी कढई
  • गाळणी
  • स्प्रे बॉटल
कृती :
  • सगळ्यात आधी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर लोखंडी कढई गॅसवर ठेवा आणि त्यात 3 ग्लास पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाका.
  • 10-15 मिनिट मंद आचेवर शिजल्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरेल.
  • गुलाबाच्या पाकळ्या हलक्या गुलाबी किंवा पांढरा होईपर्यंत शिजू द्या त्यानंतर गॅस बंद करा.
  • पाणी गार झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये गाळून घ्या.
  • तयार गुलाब जल चेहऱ्यावर किंवा केसांमध्ये लावा.
  • घरी तयार केलेले हे गुलाब जल तुम्ही 20-25 दिवस वापरु शकता.

गुलाब जल त्वचेसाठी फायदेशीर

Rose Water Benefits for Skin & Tips for Healthy Skin | ClearSkin

- Advertisement -

 

  • चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी गुलाब जल फायदेशीर आहे.
  • चेहऱ्यावरील जळजळ दूर करण्यासाठी देखील गुलाब जल उत्तम आहे.
  • गुलाबामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.
  • उन्हामुळे होणारी टॅनिंग देखील गुलाब जलमुळे दूर होते.

गुलाब जल केसांसाठी फायदेशीर

Rosewater Benefits for Skin and Hair: Enhances Complexion and Makes Hair Soft and Shiny - hair buddha

 

  • गुलाबामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म तसेच दाहक-विरोधी क्षमता असते. ज्यामुळे गुलाबपाणी केसात होणारी जळजळ कमी करू शकतात.
  • डोक्यातील कोंडा आणि असंतुलनामुळे उद्भवणाऱ्या केसांच्या इतर समस्या दूर करून गुलाबाचे पाणी केस मजबूत करू शकतात.
  • गुलाबजल केसातील कोरडेपणा दूर करते.

हेही वाचा :

काकडीच्या फेस पॅकचा ‘या’ वेगवेगळ्या पद्धतीने करा वापर

- Advertisment -

Manini