ब्लड प्रेशरवर घरगुती उपचार

ब्लड प्रेशरवर घरगुती उपचार

धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली उच्च रक्तदाबाचा त्रास अनेकांना जाणवतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयासंबंधित आजार, हार्ट अटॅक, किडनी निकामी होण्यासारखे आजार उद्भवतात. अनेक आजारांना निमंत्रण देणार्‍या या उच्च रक्तदाबाच्या त्रासावर तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या औषधांसोबतच घरच्या घरी देखील काही उपचार करु शकता.

लसूण- दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश करा. लसूण कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कच्चा लसून खाल्यास अतिउत्तम.

कांदा आणि मध- दिवसाची सुरुवात एक कप कांद्याचा रस आणि दोन चमचे मध यांच्या मिश्रणाने करा.

गाजर- दोन दिवसातून एकदा गाजर आणि पालकाचा रस घ्यावा. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बीट – बीटाचा रस ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दोन दिवसातून एकदा तरी बीटाचा रस घ्या.

First Published on: September 15, 2018 12:00 AM
Exit mobile version