मासिक पाळीवर घरगुती उपाय

मासिक पाळीवर घरगुती उपाय

(फोटो प्रातिनिधिक आहे)

मासिक पाळीचे दिवस हे स्त्रियांसाठी एक मोठी डोके दुखी ठरते. या दिवसात स्त्रियांच्या पोटात दुखणे, थकवा येणे, चिडचिड होणे असे त्रास उद्भवतात. अशावेळी घरच्या घरी मासिक पाळीवर उपाय करुन आराम मिळू शकतो. जाणून घेऊया कोणते ते उपाय…

दूध

मासिक पाळीच्या दिवसात पोटात दुखते. अशावेळी पोटाला व्हिक्स लावून गरम पाण्याचा शेक घ्यावा. त्याचबरोबर नाश्त्यामध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करावा. दुधाच्या कॅल्शिअममुळे पोटदुखी कमी होण्यास मदत होते.


गरम पाणी

या दिवसात गरम पाण्याचा पिण्याकरता वापर करावा. तसेच आंघोळीसाठी देखील गरम पाणी वापरावे यामुळे पोट आणि पाठीला आराम मिळतो.

पपई

पाळीच्या दिवसात पपई खावी यामुळे होणारा प्रवाह नियंत्रीत होतो. त्याचप्रमाणे गाजराचा ज्यूस घेतल्याने आराम मिळतो.


जिरं

मासिक पाळीच्या त्रासावर जीऱ्याचे पाणी पिणे हा एक रामबाण उपाय आहे. जीऱ्याचे पाणी पिल्याने मासिक पाळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांनी मासिकपाळीत होणारा त्रास कमी होतो.


बडिशेप

बडिशेप किंवा धणे हे मासिक पाळीवर फायदेशीर ठरतात. मासिक पाळीवर दरम्यान बडिशेप किंवा धणे रात्रभर भिजवून ठेवावे आणि सकाळी हे पाणी पिल्यास त्वरित आराम पडतो.

First Published on: June 25, 2018 4:54 PM
Exit mobile version