झटपट वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

झटपट वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल लठ्ठपणा आजच्या जीवनातील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जाताना दिसत आहे. बहुतांश लोक यासाठी अनेक उपाय करतात. यासाठी ते व्यायाम, डाएट, जिम यांसारख्या अनेक गोष्टी फॉलो करताना दिसत आहे. तुम्ही तुमचे वजन काही नैसर्गिक पदार्थांच्या सेवनाने नियंत्रणात ठेऊ शकता.

दही/ ताक

दही किंवा ताकाचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालू शकता.

मध 

मध लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने याचा चांगला फायदा होतो.

आवळा

 

आवळा आणि हळद समान प्रमाणात घेऊन बारीक चूर्ण तयार करुन घ्या. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास कंबर बारीक होण्यास मदत होते.

गाजर

गाजराचे भरपूर सेवन करावे यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जेवणासोबत नियमित गाजर सेवन करणे शरीराकरता फायदेशीर आहे.

पपई

पपईर्च नियमित सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. याकरता पपईचे दररोज सेवन केल्यास कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.


हेही वाचा :

चमच्याने नाही; हाताने जेवा आणि आजार दूर करा

First Published on: August 26, 2023 1:30 PM
Exit mobile version