दातदुखी कमी करण्यासाठी करा घरगुती उपाय

दातदुखी कमी करण्यासाठी करा घरगुती उपाय

दातदुखी कमी करण्यासाठी करा घरगुती उपाय

दातदुखीला सुरुवात झाली की ती दुसरं तिसरं काही सुचू देत नाही. दातदुखायला लागला की कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. वेदना देखील जास्त प्रमाणात होत असतात. कधी कधी रक्त देखील येऊ लागत. दातदुखीमुळे खाणं देखील कमी होत. सतत पातळ पदार्थ खावे लागतात. त्यामुळे आज आपण दातदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय करता येतील हे जाणून घेणार आहोत.

दातदुखीच्या वेदना कमी करायच्या असतील तर एका प्लास्टिकच्या पिशवीत बर्फ घेऊन ती पिशवी स्वच्छ कपड्यात बांधून दात दुखतो त्या ठिकाणी ठेवा.

याशिवाय तुम्ही वेदना कमी करण्यासाठी लसू देखील वापरू शकता. लसणाच्या काही पाकळ्या चावायच्या. लसणात अॅलिसिन हा घटना असतो. जो एक नैसर्गिक अँटीबॅक्टीरियट एजंट आहे. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

दात दुखण्यासापासून आराम मिळण्यासाठी हळदीची पेस्ट तयार करून दातावर लावा.

तसेच तुम्ही वेदना कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या देखील करू शकता.

दातदुखीपासून मुक्त होण्यासाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे लवंग तेल. अनेक जण दातदुखीच्या समस्येवर लवंग तेल वापरण्याचा सल्ला देतात. लवंग तेलाचे थेंब कापसावर घ्या आणि जिथे वेदना होत आहेत त्या ठिकाणी ठेवा.

एक ग्लास पाण्यात चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर सैंधव घालून उकळून घ्या. त्यानंतर पाणी कोमट करून त्या पाण्याच्या चूळ भरा. यामुळेही दातदुखी बंद होते.


हेही वाचा – उभ्याने करताय पाण्याचे सेवन; आजच सोडा ही सवय


 

First Published on: June 14, 2020 6:00 AM
Exit mobile version