घरलाईफस्टाईलउभ्याने करताय पाण्याचे सेवन; आजच सोडा ही सवय

उभ्याने करताय पाण्याचे सेवन; आजच सोडा ही सवय

Subscribe

उभं राहून पाणी पिणे धोकादायक!

पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. मात्र, बऱ्याचदा आपण बाहेरुन कुठूनही आलो की, फ्रिजचा दरवाजा उघडतो आणि तोंडाला पाण्याची बॉटल लावतो. मात्र, असे उभ्याने पाणी पिणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. यामुळे आजार आपण ओढावून घेतो. चला तर जाणून घेऊया उभ्याने पाणी पिण्याचे तोटे.

किडनीत संसर्ग होऊ शकतो

- Advertisement -

उभ्याने पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते. यामुळे त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. तसेच उभ्याने पाण्याचे सेवन केल्याने ते वेगाने वाहून जाते. यामुळे किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो.

शरीरातील पदार्थ पचत नाहीत

- Advertisement -

उभे राहून पाणी प्यायलास शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.

स्थायूंवर दाब पडतो

उभ्याने पाण्याचे सेवन केल्याने अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात होतो. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो.

पोटात जळजळ होते

पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगाने होते आणि अॅसिडीटीचा त्रास होतो.

तहान पूर्णपणे भागत नाही

उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. कारण उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. त्यामुळेच निवांत एका जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.


हेही वाचा – मासे खा; तंदरुस्त रहा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -