‘तोंड’ आलंय? हे उपाय देतील आराम

‘तोंड’ आलंय? हे उपाय देतील आराम

फोटो सौजन्य - mdsaude.com

तोंड येण्याच्या समस्येमुळे तुम्हीसुद्धा कधी हैराण झाला आहात का? ‘तोंड येणं’ म्हणजेच ओठ, जीभ किंवा टाळू या तोंडाच्या आतील भागांवर फोड किंवा सूज येणं. तोंड आल्यावर बोलताना, खाताना खूप त्रास होतो. या समस्येपासून त्वरित सुटकारा मिळवण्यासाठी तुम्ही घरच्याघरी काही सोपे उपाय करु शकता. जाणून घेऊया, कोणते आहेत हे घरगुती उपाय…

१. तूप

बहुतांशी घरांमध्ये तूप हे हमखास असतंच. तोंड आलेल्या अर्थात फोड आलेल्या ठिकाणी हलक्या हाताने तूप लावा. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा हे केल्यास लवकर आराम पडेल. तूप घरी बनवलेले असेल तर अधिक उत्तम.

फोटो सौजन्य- thepioneerwoman.com

२. तुळस

आजच्या काळाच प्रत्येकाच्या दाराबाहेर तुळस असणं दुर्मिळच. मात्र, तुमच्या घरी तुळस असेल तर तुळशीची पानं थोडीशी चुरडून तोंड आलेल्या भागवार लावा किंवा तुळशीचे अख्खं पानही तुम्ही खाऊ शकता. तुळशीत असलेले औषधी गुणधर्म तोंड येण्याचा विकार बरा करु शकतात.

फोटो सौजन्य – kalamtimes.com

३. नारळ 

तोंड येण्याची समस्या दूर करण्यासाठी नारळ खूप फायदेशीर ठरतो. खोबऱ्याचे तेल, नारळाचे पाणी किंवा सुके खोबरे या तिन्ही गोष्टी तुमचा माऊथ अल्सर दूर व्हायला मदत होते.

फोटो सौजन्य – today.com

४. मध

माऊथ अल्सर बरा करण्यासाठी मधाचा दुहेरी फायदा होतो. मधातील अॅंटी मायक्रोबिअल घटकांमुळे माऊथ अल्सर बरा होतोच. मात्र त्याशिवाय ओठांवर राहिलेले फोडांचे व्रण नाहीसे करण्याचं कामही मध करतो.

फोटो सौजन्य- thecostaricanews.com

 

First Published on: June 21, 2018 1:54 PM
Exit mobile version