कपड्यांवरील डाग काढण्यासाठी घरगुती टिप्स

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी घरगुती टिप्स

Tips for cleaning clothes

* कपड्यावर बॉलपेनच्या शाईचा डाग पडल्यास तेवढा भाग थोडा वेळ थंड दुधात बुडवून ठेवावा. मग घासून धुवावा. अथवा शाईच्या डागावर टूथपेस्ट लावून ठेवावी. पेस्ट सुकल्यावर साबणाने धुवावे.

* कपड्यावरील गंजाचा डाग काढण्यासाठी एक तास कपड्यावर लिंबाचा रस लावून ठेवावा. मग ब्रशने तो भाग घासून थंड पाण्याने धुवावा.

* जखम होऊन कपड्यावर रक्ताचे डाग पडल्यास कपडे मिठाच्या पाण्याने धुवावेत.

* कपड्यावर घामाचे डाग पडल्यास कपडा लगेच पाण्यात टाकावा.

* कपड्यावरील चहाचे डाग काढण्यासाठी, त्या डागावर रात्रभर ग्लिसरीन लावून ठेवावे आणि सकाळी थंड पाण्याने धुवावे.

* बर्‍याचदा परफ्यूमचा महागड्या कपड्यावर पिवळा डाग पडतो. असे होऊ नये म्हणून परफ्यूम आधी रुमालावर उडवून पाहावे मगच ते कपड्यांवर उडवावे.

* कपड्याला डांबर लागल्यास प्रथम डांबर बोथट वस्तूने खरवडून नंतर निलगिरी तेल लावावे.

* एका कपड्याचा रंग दुसर्‍या कपड्याला लागल्यास डाग पडलेला भाग गरम पाण्यात बुडवून ठेवावा.

First Published on: October 25, 2018 12:38 AM
Exit mobile version