फक्त 5 मिनिटांमध्ये चमकवा काळ्या पडलेल्या मुर्ती आणि भांडी !

फक्त 5 मिनिटांमध्ये चमकवा काळ्या पडलेल्या मुर्ती आणि भांडी !

फक्त 5 मिनिटांमध्ये चमकवा काळ्या पडलेल्या मुर्ती आणि भांडी !

सध्या घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. यासोबतच पूजा अर्चाही सुरू झाल्या आहेत. यामुळे घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील मूर्ती आणि पूजेच्या भांडाण्या उजळवता येतात.त्यासाठी काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत.(How to Clean Copper and Brass )

टोमॅटो केचप-

टमॅटोमध्ये अॅसिड असल्यामुळे पितळेच्या भांड्यावर पडलेले डाग काढण्यासाठी मिटवण्यासाठी टोमॅटो केचप आणि टोमॅटो सॉस किंवा पेस्ट लावल्यास मूर्ती लख्ख चमकतात, तसेच पितळाचे भांडे टोमॅटोने साफ केल्याने त्यांना साबनाने धुतल्यास त्याची चमक लवकर जाणार नाही.

लिंबू आणि मीठ –

तांबे ,पितळेची भांडी किंवा मूर्ती साफ करण्यासाठी लिंबू घ्या आणि मीठ घ्या पुढे लिंबू -मीठ भांड्यावर 5 मिनिंट घासा आणि कोमट पाण्याने सर्व भांडी स्वच्छ करा यामुळे भांड्यावरील काळेपणा निघून जाईल.

पीठ, मीठ आणि व्हिनेगर –

पितळेच्या काळ्या पडलेल्या मूर्तीसाठी पीठ, मीठ आणि व्हिनेगर या 3 पदार्थांचं मिश्रण उपयोगी ठरू शकतं. हे 3 पदार्थ एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि काळ्या पडलेल्या पितळेच्या मूर्तीवर लावा. एक तासानंतर गरम पाण्याने स्वच्छ करा. व्हिनेगरमुळे मूर्ती स्वच्छ होतात.


हे हि वाचा – Cold Water Benefits: बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास होणार ‘हे’ फायदे

First Published on: September 5, 2021 2:09 PM
Exit mobile version