लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आहार कसा ठेवाल? जाणून घ्या

लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आहार कसा ठेवाल? जाणून घ्या

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेला आळा घालण्यासाठी किंवा ही साखळी तोडण्यासाठी सध्या एकमेव उपाय आहे तो म्हणजे लसीकरण. त्यामुळे संपूर्ण देशभरात लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. परंतु, लस घेतल्याने अनेकांना डोके दुखी, ताप, अंगदुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे यातील काहीजण लसीकरण करुन घेण्यासाठी नकार देतात. परंतु, जर लस घेतल्यानंतर आपला आहार योग्य असले तर ज्या समस्या उद्भवतात, त्याचे प्रमाण फार कमी होते आणि त्रास देखील होत नाही. चला तर जाणून घेऊया लस घेतल्यानंतर कोणता आहार घ्यावा.

कांदा आणि लसूण

कांदा आणि लसूण याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. कारण कच्च्या लसूणमध्ये अधिक प्रमाणात मॅग्निज, विटामिन बी ६, फायबर, सेलेनियम, विटामिन सी आणि काही प्रमाणात कॅल्शिअम, कॉपर, पोटॅशियम, आर्यन आणि फॉस्फरस असते. तर कांद्यामध्ये अधिक प्रमाणात विटामिन सी असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

फळ

ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, अशा फळांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा, योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते. याकरता टरबूज, खरबूज, चिकू, बेरी, अननस, आंबा आणि केळी या फळांचे सेवन करावे. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच लस घेतल्यानंतर होणारा त्रास देखील कमी होतो.

हिरव्या भाज्या

कोणतेही गंभीर दुष्परिणाम टाळण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. याकरता हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे लस घेतल्यानंतर हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. तर ज्या व्यक्तींना सलाड खाण्याची सवय असते, अशा व्यक्तींनी हिरव्या भाज्यांचा सलाडमध्ये समावेश करावा.

हळद

हळदीच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हळदीचे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि पचनशक्ती देखील सुधारते. त्यामुळे आहारात हळदीचा अधिक प्रमाणात वापर करावा. रात्री झोपण्यापूर्वी दुधात हळद घालून त्याचे सेवन करावे, यामुळे त्याचा अधिक फायदा होतो.

पाणी

लस घेतल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहणे फार गरजेचे असते. त्यामुळे पाण्याचे अधिक प्रमाणात सेवन करावे. परंतु, याकरता ठंड नाही तर साध्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे साइड इफेक्ट्स देखील कमी होतात. तसेच तुम्ही पाण्याव्यतिरिक्त फळांचा रस, सलाड ज्यूस याचे देखील सेवन करु शकता. यामुळे लस घेतल्यानंतर पाण्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे.

धान्य

आहारात धान्याचा समावेश करावा. यामध्ये ब्राऊन राइस, पॉपकॉर्न, बाजरी, ज्वारी आणि ओट्स याचा आहारत समावेश करावा.

चांगली झोप

लस घेण्यापूर्वी एक दिवस चांगली झोप घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतर देखील थकवा आणि अंगदुखी जाणवू लागते. त्यामुळे लस घेतल्यानंतर आराम करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

First Published on: May 20, 2021 11:41 AM
Exit mobile version