पालकांच्या भांडणात मुलांनी मध्यस्थी कशी करावी?

पालकांच्या भांडणात मुलांनी मध्यस्थी कशी करावी?

चंदा मांडवकर : 

 

आजच्या पालकांना आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे आणि काय वाईट हे अचूक माहिती असते. मात्र तरीही काही वेळेस पालक अशा काही चुका करतात की त्यामुळे मुलावर त्याचा परिणाम होतो. जसे की, आपल्या रागावर नियंत्रण नसणे आणि अशातच मुलांसमोर एकमेकांशी भांडण सुरु करणे. पालकांना आपण भांडताना आपलं मुलं त्या गोष्टीला कशा पद्धतीने घेईल हे कळत नाही. कारण अशा गोष्टींचा मुलांच्या मनावर लगेच परिणाम होतो. ते तुमच्याशी कमी बोलू लागतात, त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य होईल तितके त्यांच्या समोर पालकांनी वाद-भांडण करणे टाळावे.

याआधी एकत्रित कुटुंबात नवरा-बायको मध्ये अशी भांडण फार कमी व्हायची. जरी झालीच तरीही एकमेकांना समजावण्यासाठी घरातील मोठी मंडळी त्यामध्ये सहभागी असायची. पण सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत घरगुती वाद होणे ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलांची भुमिका यामध्ये फार महत्वाची झाली आहे. काही मुलं पालकांच्या भांडणात मध्यस्थी करत त्यांना समजावत आहेत. त्यामुळे जेव्हा कधी पालकांमध्ये भांडण झाले तर तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवत त्यांच्या मधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करु शकता.

दोघांना एकमेकांचे महत्व पटवून द्या

जेव्हा नवरा-बायको मध्ये भांडण होते तेव्हा ते काही दिवस एकमेकांशी बोलणे बंद करतात. अशातच त्या दोघांमध्ये पुन्हा सुसंवाद कधी सुरु होणार असा प्रश्न उभा राहतो. अशातच मुलाने आपल्या पालकांना एकमेकांचे महत्व समजावून सांगावे. कशा प्रकारे आई वडिल एकमेकांना प्रत्येक वेळी सांभाळून घेते, साथ देते अशा काही गोष्टी. तर जेव्हा दोघांना एकमेकांचे महत्व पटेल तेव्हा त्यांच्यामधील राग शांत होऊन ते पुन्हा बोलण्यास सुरुवात करतील.

दोघांचे बोलणे करुन देण्याचा प्रयत्न

भांडणात असो किंवा भांडण झाल्यानंतर राग तर प्रत्येकाच्या डोक्यात असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा काही दिवस का होईना तिरस्कार करतो. त्यामुळे मुलांचे यामध्ये अशी भुमिका असली पाहिजे की, त्यांनी पालकांमधील वाद मिटवावा. त्यांना आधीसारखे एकत्रित आणावे. ते दोघे एकमेकांशी कसे पुन्हा बोलतील यासाठी प्रयत्न करावा. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा की, वाद-भांडणामुळे केवळ मनस्तापच होतो आणि त्यामुळे मानसिक ताण अधिक वाढला जातो.

एकमेकांसाठी वेळ द्या

काही वेळेस नवरा-बायको मध्ये भांडण झाल्यानंतर दोघेही एकमेकांचे ऐकण्याचा मनस्थितीत नसतात. त्यामुळे त्या दोघांना त्यांच्या स्थितीत काही वेळ एकटे सोडा. जेव्हा त्यांचे मन आणि राग शांत होईल तेव्हा ते एकमेकांशी जरुर बोलतील. पण त्यांना मुलांनी त्यासाठी वेळ दिला पाहिजे. तसेच त्यांना आपण कुठे चुकलो हे सुद्धा कळेल.

कोणाची ही बाजू घेऊ नका

पालकांमध्ये जेव्हा भांडण होते तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करा. पण त्यावेळी तुम्ही दोघांची ही बाजू ऐकून घ्या. परंतु लक्षात ठेवा की, त्यावेळी कोणाचीही बाजू घेऊ नका. कारण जर तुम्ही आईची बाजू घेतील तर वडिल नाराज होऊ शकतात. तसेच वडिलांची बाजू घेतली तर आई नाराज होईल. त्यामुळे अशी स्थिती उद्भवण्यापेक्षा तुम्ही तटस्थ राहून स्थिती हाताळा. त्या दोघांना समजावून सांगा.

दोघांना डिनरसाठी बाहेर पाठवा

पालकांमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी सरप्राइज प्लॅन करु शकता. दोघांसाठी डिनर प्लॅन करा आणि त्यांना त्यांचा वेळ एकमेकांसोबत घालवण्याची संधी द्या. अशातच दोघांमध्ये आणि त्यांच्यामधील वाद मिटेल. पुन्हा प्रेम वाढू शकते

तुमचे सुद्धा ऐकत नसतील तर नातेवाईकांना सांगा बऱ्याच वेळा असे होते की, पालकांमध्ये भांडण होतात आणि मुलं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना डावलले जाते. अशावेळी मुलांनी जर पालक तुमचे सुद्धा ऐकत नसतील तर तुम्ही तुमच्या परिवाराच्या जवळच्या नातेवाईकांना त्यांच्यामधील वाद मिटवण्यास सांगू शकता. परंतु त्यावेळी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगण्याची गरज नाही. हे सुद्धा लक्षात ठेवा. अन्यथा गोष्टी बिघडू शकतात.


हेही वाचा :

वहिनी आणि नणंदेचं नातं कसं असावं?

First Published on: February 16, 2023 3:10 PM
Exit mobile version