‘अशी’ वाढवा मनाची एकाग्रता

‘अशी’ वाढवा मनाची एकाग्रता

'अशी' वाढवा मनाची एकाग्रता

जगात सर्वात वेगाने धावणारे काही असेल तर ते ‘मन’. मन हे केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. पण, बऱ्याचदा हे मन विचलित देखील होते. मात्र, हे मन विचलित होऊ नये किंवा मनाची एकाग्रता वाढवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, ही मनाची एकाग्रता वाढवायची असेल तर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया मनाची एकाग्रता कशी वाढवावी.

बुद्धीचे खेळ खेळा

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी बुद्धीचे खेळ खेळणे फार गरजेचे आहे. कारण मेंदूला एका प्रकारचा विचार करायची शिस्त लावायची असेल तर तसे खेळ खेळणे देखील महत्त्वाचे आहे. याकरता सुडोकू, बुद्धीबळ आणि शब्दकोडी सोडवावी.

पुरेशी झोप

झोपेचा आपल्या शरीरावर आणि मनावर फारच परिणाम होत असतो. त्यामुळे पुरेशी झोप होणे फार गरजेचे असते. कारण झोप पुरेशी नसेल तर त्याचा साहजिकच एकाग्रतेवर परिणाम होतो.

व्यायाम करावा

शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी व्यायाम करणे फार गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीराबरोबरच मन सुद्धा ताजेतवाने होते. यासोबतच आपले मन देखील एकाग्र राहण्यास मदत होते.

निसर्गाच्या सानिध्यात घालवा वेळ

हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, वेगवेगळे पक्षी आणि त्यांचे आवाज अशा निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवणे खूपच फायदेशीर ठरते. मनाची एकाग्रहता वाढवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा.

संगीत ऐका

अनेक लहान मुलांना तसेच मोठ्या व्यक्तींना कामाच्या व्यापामुळे फार कंटाळा येतो. यामुळे बऱ्याचदा लक्ष विचलित होते, अशावेळी संगीत ऐकणे एक उत्तम पर्याय आहे. संगीत ऐकल्यामुळे मनाची एकाग्रहता वाढण्यास मदत होते.

First Published on: November 27, 2020 6:09 AM
Exit mobile version