एक्सरसाईज आणि डाएट व्यतिरीक्त करा वजन कमी…

एक्सरसाईज आणि डाएट व्यतिरीक्त करा वजन कमी…

डाएट फूड

वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. याकरिता अनेक उपाय देखील केले जातात . यांत कुणी डाएट करतं तर कुणी एक्सरसाईजला प्राधान्य देतं. हे करून देखील वजन नियंत्रणात येतेच असे नाही. अशावेळी नेमके काय करावे याबाबत बरेच जण गोंधळलेले दिसतात. व्यग्र जीवनशैलीमुळे कोणालाच स्वतःच्या आरोग्याकडे काळजीपुर्वक लक्ष देता येत नाही. रोजच्या धावपळीच्या वेळापत्रकात व्यस्त असतांना आरोग्यासंदर्भात चर्चा करतांना वजन नियंत्रित करायचे तर, जॉगींग, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीमला जाणे अशी सहाजिक उत्तरं कोणाकडूनही मिळतात. परंतु, वरील कोणत्याही पद्धतीचा अवलंब न करता केवळ पुरेशा झोपेने तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात आणू शकता.

योग्य झोप घ्या 

आपल्या शरिराला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही किंवा जे घेत नाही त्यांच्या शरीराच्या प्रक्रियेत पुर्णतः व्यत्यय येतो. या प्रक्रियेत व्यत्यय आल्यास आपल्या हार्मोन्समध्ये संतुलन राहत नाही. हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास शरीरावर त्याच्या परिणाम होऊन आपले वजन वाढते. रात्री कामानिमित्त जागरण करणे, मोबाईल फोन्सवर गेम्स, चॅटिंग करणे आणि टि.व्ही बघणे याचे प्रमाण कमी करुन झोपेस अधिक प्राधान्य दिले पाहीजे.

रात्रीचे जेवण वेळेत घ्या 

रात्रीचे जेवण आठ ते नऊवाजेच्या दरम्यान केले पाहीजे. संध्याकाळी किंवी अति उशीरा जेवण करु नये. रात्रीचे जेवण लवकर केल्याने तुम्हाला पुन्हा भूक लागू शकते. सलग एक आठवडा रात्रीचे जेवण केल्याने तुमचं वजन १ किलो ग्रॅमपर्यत वाढू शकतं. रात्री अवेळी न खाता वेळेत जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या.

झोप जेवढी उत्तम तेवढ्या कॅलरी बर्न  

आपण झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची प्रक्रिया सुरू असते. ही प्रक्रिया सुरळीत राहवी यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. ही एनर्जी आपल्या शरिरातील कॅलरी बर्न करण्यास मदत करत असते. अशावेळी जेवढी झोप चांगली तितक्या जास्त कॅलरी शरिरात बर्न होतात. जे लोक चांगली झोप घेतात ते कमी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत २० टक्के कमी कॅलरी बर्न करतात.

First Published on: February 26, 2019 5:20 PM
Exit mobile version