टेस्ट मध्ये बेस्ट ‘बटर चिकन नूडल्स’

टेस्ट मध्ये बेस्ट ‘बटर चिकन नूडल्स’

टेस्ट मध्ये बेस्ट 'बटर चिकन नूडल्स'

नूडल्स ही अशी एकमेव डिश आहे जी तुम्ही कधीही आणि कुठेही खाऊ शकता. नाश्ता असो वा दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण. नूडल्स तुम्ही खाऊ शकता. पोटही भरते आणि जिभेचे चोचलेही पूर्ण होतात. अशी ही ऑलटाईम फेवरेट डिश वेगळ्या प्रकारे कशी बनवता येते, यामुळे चव तर बदलतेच शिवाय वेगळी डिश बनवल्याचा आनंदही मिळतो. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नूडल्समध्ये सिमला मिरची, गाजर, कोबी वापरला जातो. हाका नूडल्स, शेजवान नूडल्स, गार्लिक नूडल्स असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. पण जर तुम्हाला खाण्यामध्ये व्हरायटी हवी असेल, नवीन डिश ट्राय करण्याची आवड असेल तर बटर चिकन नूडल्स बनवाच. कारण ही डिश हटके तर ठरेलच शिवाय घरच्यांकडून तुमचे कौतुकही होईल.

साहित्य

२ टोमॅटो, २ कांदे बारीक चिरलेले, १ चमचा आलं लसूण पेस्ट, वेलची, २ अख्खी लाल मिरची, ४ लवंग, १ तूकडा दालचिनी, अर्धी वाटी काजू, २ चमचे अमूल बटर. वाफवून घेतलेल्या २ बाऊल नूडल्स, चिकनचे वाफवून घेतलेले तुकडे.

कृती

सर्वप्रथम एका कढईत अमूल बटर गरम करून घ्यावे. त्यात कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट. लाल मिरच्या, दालचिनी, काजू एक एक करत १० मिनिटे परतून घ्यावे. टोमॅटो मऊ शिजले की थंड झाल्यावर मिक्सरला लावावेत. गाळून घ्यावे. नंतर दुसऱ्या एका कढईत हे मिश्रण टाकावे. मीठ, चिमूटभर साखर टाकावी. नंतर यात नूडल्स आणि चिकनचे तुकडे टाकावेत.


हेही वाचा – घरी बनवा व्हेज चीज फ्रँकी


 

First Published on: June 17, 2021 7:00 AM
Exit mobile version