मिक्स व्हेजिटेबल भजी नक्की ट्राय करा

मिक्स व्हेजिटेबल भजी नक्की ट्राय करा

मिक्स व्हेजिटेबल भजी नक्की ट्राय करा

पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी आलीच. त्यातही कांदा भजी, बटाटा भजी खाण्याची मजा काही औरच. पण आज आम्ही तुम्हाला मिक्स व्हेजिटेबल भजी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

साहित्य

१ दोडका, १ रताळे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबिर, अर्धी वाटी लाल भोपळा, पाव वाटी चिरलेले बेबी कॉर्न, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव वाटी फ्लॉवर, पाव वाटी कापलेले कच्च केळ, प्रमाणानुसार बेसन पीठ, तिखट, मीठ, ओवा, खाण्याचा सोडा, हळद.

कृती

भज्याचे पीठ तयार करावे. त्यात मीठ, तिखट, हळद, ओवा, खाण्याचा सोडा टाकावा. प्रमाणात पाणी घेऊन त्यात सगळ्या भाज्या टाकाव्यात, गरम तेलात मिक्स भाज्यांची भजी कुरकुरीत तळून घ्यावीत. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर छान लागतात.


हेही वाचा – झटपट बनवा भेंडीची भजी


 

First Published on: June 11, 2021 7:00 AM
Exit mobile version