शिंगाड्याचे थालीपीठ

शिंगाड्याचे थालीपीठ

शिंगाड्याचे थालीपीठ

हिवाळ्याचा महिना सुरू झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात शिंगाडा उपलब्ध होता. शिंगाडा खाण्याचे आपल्याला अनेक फायदे माहित आहेत. त्यामुळे आज आपण पौष्टिक शिंगाड्याचे थालीपीठ कसे तयार करतात हे पाहणार आहोत. शिंगाड्याचे थालीपीठ तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता

साहित्य

कृती

पहिल्यांदा एका भांड्यात शिंगाड्याचे एक कप पीठ घ्यायचं. मग बारीक चिरलेले दोन शिजवलेले बटाटे त्यामध्ये टाकायचे. त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कुट घालायचा. मग बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. नंतर त्यामध्ये एक चमच जिरे, एक चमच साखर, दोन मोठे चमचे दही आणि मीठ चवीनुसार घालायचं. मग त्यामध्ये एक चमच तेल घालून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचे. यामधले बटाटे चांगले बारीक करायचे. मग त्यामध्ये पाणी टाकून थालीपीठाप्रमाणे मळायचं. पीठ मळून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटं झाकून ठेवायचं. त्यानंतर पीठाचे गोले करून ते थापून घ्यायचं आणि तव्यावर तूपात किंवा तेलामध्ये ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही शिंगाड्याचे थालीपीठ तयार करू शकता.

First Published on: October 26, 2020 7:10 AM
Exit mobile version