झटपट तयार करा ‘सिंधी कढी’

झटपट तयार करा ‘सिंधी कढी’

झटपट तयार करा 'सिंधी कढी'

लॉकडाऊनमध्ये आपण अनेक रेसिपी घरी ट्राय करत आहोत. त्यामुळे आज आपण व्हिटॅमिन, प्रोटीन युक्त अशी रेसिपी पाहणार आहोत. सिंधी कढी ही तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता.

साहित्य 

गाजर, फ्लोअर, शेवग्याच्या शेंगा, बटाटा, गवारी, भेंडी, तेल, मोहरी, जिरे, मेथीचे दाणे, हिंग, बेसन, लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, काश्मिरी लाल तिखट, मीठ, चिंचेचा कोळ

कृती

पहिल्यांदा तेलात सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या. मग त्यानंतर एका कडईत तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, मेथीचे दाणे थोड्या प्रमाणात आणि हिंग घ्यालायचे. मग कढीपत्ता घालून त्यात दोन चमचे बेसन घालून ते परतवून घ्यायचे. त्यानंतर लाल तिखट, हळद टाकून त्यात दोन ग्लास पाणी घालायचे. भाज्या शिजेल एवढ्या प्रमाणात पाणी घालायचे. मग त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. जर तुम्हाला कढीला लाल कलर हवा असेल तर काश्मिरी लाल तिखट घाला. त्यानंतर अजून एक ग्लास पाणी ओता. मग त्यात सर्व भाज्या टाका आणि मीठ घालून चांगल्या शिजवा. १० मिनिटांनंतर चिंचेचा कोळ एक चमचा आणि थोडास गूळ टाकून आणखी थोड्या वेळ भाज्या शिजवा. अशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये तयार करा सिंधी कढी.

First Published on: May 31, 2020 6:15 AM
Exit mobile version