टोमॅटो सूप प्या, फिट राहा

टोमॅटो सूप प्या, फिट राहा

टोमॅटो सूप प्या, फिट राहा

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी म्हणजे कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडांची झालेली झीज भरून निघते. यामुळे आजारी व्यक्ती किंवा सृदृढ व्यक्तीनेही टोमॅटोचे सूप आठवड्यातून चार पाच वेळा प्यावे. तब्येत उत्तम राहते.

साहित्य

चार मध्यम आकाराचे लाल टॉमेटो, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, एक चमचा अमूल बटर, काळी मिरी पावडर चवीनुसार, मीठ चवीनुसार, साखर चवीनुसार

कृती

सर्वप्रथम टॉमेटो स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात टॉमेटो उकडून घ्यावेत. पाणी थंड झाल्यावर टोमॅटो एका ताटात घ्यावेत. त्याचे आवरण अलगद हाताने काढावे. नंतर शिजलेले टॉमेटो थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. बारीक चाळणीने टोमॅटोची ही प्युरी गाळून घ्यावी.  एका पातेल्यात अमूल बटर गरम करून घ्यावे. त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. मग त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकावी. प्युरी जास्त घट्ट असल्यास त्यात पाणी टाकून पातळ करावे. नंतर त्यात चवीप्रमाणे काळी मिरी पावडर आणि मीठ टाकावे. चांगली उकळी येऊ द्यावी. मग गॅस बंद करावा. शक्य असल्यास आणि आवडत असल्यास या सूपवर अर्धा चमचा क्रिम टाकून पिण्यास द्यावे. गरमागरम टोमॅटो सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.


हेही वाचा – झटपट बनवा हेल्थी बीट-गाजर न्यूस


 

First Published on: June 1, 2021 7:00 AM
Exit mobile version