घरताज्या घडामोडीझटपट बनवा हेल्थी बीट-गाजर ज्यूस

झटपट बनवा हेल्थी बीट-गाजर ज्यूस

Subscribe

बीट आणि गाजर यांचे पौष्टीक ज्यूस हे शरीरासाठी बलवर्धक असते. बीट खाल्ल्याने हिमोग्लोबीन वाढते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता ही भरून निघते. याच कारणामुळे आहारतज्त्र बीटचे ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. तसेच ज्या व्यक्ती नियमित जीम आणि व्यायाम करतात त्याच्या आहारात बीट गाजरचा आवर्जून समावेश करतात. गाजरात व्हिटॅमीन-ई असते जे डोळ्यांसाठी आवश्यक असते. म्हणूनच बीटाची चव तुरट असल्याने त्याच्या ज्यूसमध्ये गोडवा आणण्यासाठी गाजराचा उपयोग करतात. त्यामुळे ज्यूसची चव तर बदलतेच पण त्यातून व्हिटॅमिन्सही मिळतात.

साहित्य

- Advertisement -

चार मध्यम आकाराचे बीट, तीन गाजर, चवीपुरते मीठ व साखर, एक ग्लास पाणी.

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम बीट आणि गाजर सोलून घ्यावे. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करावे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर बारीक चाळणीने ते गाळून घ्यावे. त्यात मीठ आणि साखर टाकावी. नीट ढवळून पिण्यास द्यावे. तब्येतीस उत्तम असे हे बीटगाजर ज्यूस सर्व वयोगटातील व्यक्ती पिऊ शकतात.


हेही वाचा – ‘व्हिटॅमिन सी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतात गंभीर आजार,वेळीच जाणून घ्या’‘व्हिटॅमिन सी’चे महत्व


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -