Summer Season : कलिंगड भेसळयुक्त आहे का? कसं ओळखायचं

Summer Season : कलिंगड भेसळयुक्त आहे का? कसं ओळखायचं

उन्हाळ्यात बाजारात उपलब्ध असलेले कलिंगड हे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करणारे फळ आहे. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. कलिंगडामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. पण अनेकदा कलिंगड आतून खराब निघते अशा परिस्थिती थेट FSSAI (Food Safety and Standards Authority of India ) ने दिलेल्या माहितीनुसार कलिंगड ओळखण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.

बाजारात कलिंगड विकत घेताना ते नीट कसे ओळखायचे हे जाणून घेतले पाहिजे. अनेकदा कलिंगड खरेदी करताना त्याचा लाल रंग पाहून लोक दुकानदाराच्या फंदात पडतात. आजकाल कलिंगड लाल दिसण्यासाठी फळांमध्ये इंजेक्शन दिले जातात. या इंजेक्शनच्या मदतीने टरबूज फक्त लाल दिसत नाही तर रसदार आणि ताजे देखील दिसते. त्यामुळे लोक हा विचार करून कलिंगड विकत घेतात, पण इंजेक्शनमुळे कलिंगड लाल आणि रसाळ दिसतो आणि ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक नुकसान होऊ शकतात.

​FSSAI ने दिली माहिती

एफएसएसएआयने दिसेल्या माहितीनुसार कलिंगडात इंजेक्शनच्या माध्यमातून एरिथ्रोसिन केमिकल्स घातले जातात. गोड, कँन्डी, ड्रिंक्समध्ये हे केमिकल मिसळलं जातं. कलिंगड 2 भागांत कापून घ्या. त्यानंतर कापस घ्या हलकेच कलिंगडावर ते घासा.जर तुमच्या कापसावर रंग नसेल तर हे कलिंगड पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण जर कलिंगड लाल दिसण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला असेल तर कापसाने घासल्यास कापसाचा रंग लाल होतो. कापूस लाल होणे हे सूचित करते की कलिंगडमध्ये इंजेक्शन वापरले गेले आहे जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.

​कलिंगडाची निवड

बऱ्याच वेळा तुम्हाला कलिंगडाच्या पृष्ठभागावर पांढरी आणि पिवळी पावडर दिसेल. तुम्ही ते धूळ म्हणून घासून काढाल, परंतु ही पावडर कार्बाइड असू शकते, ज्यामुळे फळ लवकर पिकते. या कार्बाइड्सचा वापर आंबा आणि केळीसाठी देखील केला जातो. त्यामुळे कलिंगड कापण्यापूर्वी ते पाण्याने चांगले धुवावे.

छिद्र किंवा भेगा तपासा

कलिंगडाला जर सुया टोचल्या असतील तर अनेक वेळा लहान छिद्र होते काही वेळा या छिद्रातून भेगा सुद्धा पडतात. अनेकदा व्यापारी सुद्धा फायदा पाहून वाहतुकीदरम्यान असं झालं असावं असं सांगतात. पण तुम्हाला या दोन्हींमधील फरक लगेच लक्षात येऊ शकतो. कलिंगडावर जाळीदार रेषा येणे हे नैसर्गिक आहे पण भेग पडणे, छिद्र असणे हे भेसळीचे लक्षण आहे. अगदी कलिंगड कापल्यावर आतपर्यंत तुम्हाला हे छिद्र दिसू शकते.

आवाज तपासा

कलिंगड विकत घेताना लोक आवाजासाठी त्याला थापतात हे तुम्ही पाहिले असेल. खरं तर, योग्य कलिंगड निवडणे देखील बोटांच्या सांध्याने टरबूज हलके टॅप करून केले जाते. टरबूज पिकल्यावर मोठा आवाज येतो, तर कच्च्या टरबूजाचा आवाज मऊ असतो.

First Published on: April 11, 2024 12:11 PM
Exit mobile version