मला कोरोना झाला पण समजलचं नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या ‘ही’ ५ लक्षणे

मला कोरोना झाला पण समजलचं नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या ‘ही’ ५ लक्षणे

मला कोरोना झाला पण समजलचं नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या ही ५ लक्षणे

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. रोज १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. असे म्हटले जाते की आपल्यापैकी सर्वांनाच कोरोना होऊन गेला आहे मात्र आपल्याला कळून आले नाही. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्यांनाच कोरोना झाला असे मानले जाते. मात्र ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांनाही कधीतरी कोरोना होऊन गेला आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, आपण रिक्षा, टॅक्सी,ट्रेनने, बसने प्रवास करतो. प्रवासादरम्यान आपण अनेकांच्या संपर्कात येतो. कोरोनाची काही लक्षणे लाँग कोविडच्या रुपात काही महिन्यांपर्यंत टिकू शकतात.  टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे, त्यात असे म्हटले आहे, की डॉक्टर आणि संशोधकांनी सांगितल्यानुसार, आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोरोना झाला त्याची कारणे वेगळी असतील मात्र कोरोनाची लक्षणे न दिसल्याने रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्याचप्रमाणे काही जणांनी लक्षणेच न दिसल्याने कोरोना चाचणीच केली नाही. मात्र प्रत्येकाला एकदा तरी कोरोना झाला आहे असे म्हटले जाते मात्र ते ओळखायचे कसे? जाणून घ्या पुढील ५ लक्षणे.

डोळे लाल होणे


देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दी, ताप अशी लक्षणे होती. मात्र दुसऱ्या लाटेत डोकेदुखी,डोळे लाल होणे ही लक्षणेही दिसून आली आहेत. तुम्हाला ताप, सर्दी खोकला नाही परंतु डोळे लाल होणे हे ही कोरोनाचे लक्षण असू शकते. तुम्हाला अशी लक्षणे दिसली असतील तर तुम्हालाही कोरोना झाला मात्र समजले नाही.

थकवा येणे


शरीरात प्रचंड धकवा येणे हेही कोरोनाचे लक्षण असू शकते. ३-४ दिवस सतत थकवा जाणवणे, काम करु नये असे वाटणे, संपूर्ण शरीर दुखणे ही लक्षणे दिसून येतात. तुम्हालाही याआधी थकवा जाणवला असेल तर तुम्हालाही कोरोना झाला असेल मात्र तुम्हाला कळले नाही.

ब्रेन फॉग होणे

ब्रेन फॉग म्हणजे सतत कन्फूजन होणे किंवा मन एकाग्र न होणे, कॉन्सट्रेशन करण्यासाठी अडथळा निर्माण होणे. कोरोनामुळे लोकांच्या मनावर, स्मृर्तीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काम करताना फोकस नसणे, आधीच्या गोष्टी विसरणे अशा अनेक समस्या जाणवतात.

डायरिया, मळमळ होणे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डायरिया, मळमळ होणे त्याचप्रमाणे पोटात गोळा आल्यासारखे वाटणे, भूक कमी लागणे ही लक्षणे दिसून आली आहेत. तुम्हालाही याआधी असे काही जाणवले असेल तर तुम्हालाही कोरोना झाला मात्र समजले नाही.

छातीत जडपणा किंवा अडकल्यासारखे होणे

श्वास घेण्यास त्रास होत असल्यास हे कोरोनाचे लक्षण आहे असे पहिल्यापासून सांगितले जात आहे. त्या व्यतिरिक्त छाती जड झाल्यासारखे होणे त्याचप्रमाणे छातीत काहीतरी अडकल्यासारखे वाटणे हेही कोरोनाचे लक्षण असू शकते. याआधी तुम्हालाही अशी लक्षणे दिसून आली असतील तर तुम्हालाही कोरोना झाला पण समजून आले नाही.


हेही वाचा – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात निवड करा ‘आठ’ खाद्यपदार्थांची

 

 

 

 

First Published on: April 14, 2021 11:41 PM
Exit mobile version