Health Tips : सकाळी उठल्याबरोबर करा ‘या’ 5 गोष्टी; संपूर्ण दिवस आनंदी आणि उत्साहात जाईल

Health Tips : सकाळी उठल्याबरोबर करा ‘या’ 5 गोष्टी; संपूर्ण दिवस आनंदी आणि उत्साहात जाईल

Health Tips : सकाळी उठल्याबरोबर करा 'या' 5 गोष्टी; संपूर्ण दिवस आनंदी आणि उत्साहात जाईल

दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असं म्हणतात. याबाबत प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची वेगळी विचारसरणी आणि सवय असते. काहींना खाऊन आनंद मिळतो तर काहींना सकाळी व्यायाम करून आनंद मिळतो. त्याचवेळी काही लोक सकाळी आवडती गाणी ऐकण्यात सुख मानतात. आपण जर मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास शरीरात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या हार्मोन्सशी या गोष्टी संबंधित आहेत. आपल्या शरीरात असे काही हार्मोन्स आहे जे आपल्या कधी आनंद करतात तर कधी खूप वाईट, एकटेपणा जाणून देतात. (How to Hack Your Hormones for a Better Mood)

मात्र आम्ही तुम्हाला शरीरातील अशा एका हार्मोनबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला मनातून आनंदी ठेवण्यासाठी मदत करतात. या हार्मोनला एंडॉर्फिन किंवा हॅप्पी हार्मोन (Happy Hormones) असेही म्हणतात. हे खूप लहान न्यूरोकेमिकल्स हार्मोन असून जे आपल्या शरीरात खूप महत्वाची भूमिका बजावतात.

जेव्हा आपल्याला शरीरात खूप वेदना होतात, (What is the sad hormone called?) तणतणाव असतो किंवा आपण काही खातो, सेक्स करतो, व्यायाम करतो तेव्हा आपले शरीर त्या बदल्यात एंडोर्फिन हार्मोन्स सोडते. हे हार्मोन्स वेदना कमी करणारे संप्रेरक म्हणूनही ओळखले जाते. हे पिट्यूटरी ग्रंथी आणि उर्वरित शरीरात तयार होते. (What triggers happy hormones?) अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या हॅप्पी हार्मोनला वाढवण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या तुमच्या शरीरातील हॅप्पी हार्मोन वाढवू शकतात. (What are the 5 happy hormones?)

हेही वाचा : घटस्फोट झालेल्या पुरूषांकडे ‘या’ ४ कारणांमुळे आकर्षित होतात महिला

1) व्यायाम

व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स वाढवण्यास मदत होऊ शकते. जसे की चालणे, हाय- इंटेंसिटी ट्रेनिंग, जॉगिंग, सायकलिंग, हायकिंग यामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स वाढू शकतात. याशिवाय एंडोर्फिन हार्मोन्स वाढवण्यासाठी मोकळ्या जागेच व्यायाम करणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमची व्हिटॅमिन डी पातळी देखील वाढू शकते.

2) नृत्य 

नृत्य हा व्यायामाचाच एक भाग आहे. नृत्यातूनही तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही ग्रुपसोबत नाचता, तेव्हा तुमचे बाकीच्यांसोबत चांगले बॉन्ड तयार होते. 2016 च्या एका स्टडीनुसार, सोशल बॉन्डिंगच्या माध्यमातून शरीरातील एंडॉर्फिन हार्मोन्स देखील बूस्ट केली जाऊ शकते.

3) हसणे

हसणं हे शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करते. 2017 च्या स्टडीनुसार, सोशल लाफ्टर एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करू शकते. त्याचवेळी 2011 मध्ये केलेल्या आणखी एका स्टडीनुसार, हसल्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता वाढते.

4) आवडते अन्न 

जेव्हा तुम्ही तुमचा कोणतीही आवडता कोणताही पदार्थ खाता तेव्हा ते एंडोर्फिन हार्मोनची लेवल वाढवते. त्यामुळे तुम्हाला तुमची प्रत्येक सकाळ खूप आनंददायी असावी असे वाटत असेल तर त्यासाठी तुमचे आवडते पदार्थ खा किंवा काहीतरी नवीन करून पहा. डार्क चॉकलेट आणि जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्सची लेवल वाढते, परंतु जास्त प्रमाणात काहीही खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. यासाठी काहीही मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक आहे.

5) मिठी मारणे

फिजिकल टचनेही तुमच्या शरीरात अनेक चांगले बदल दिसून येतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हॅपी हार्मोन रिलीज होतो. ऑक्सिटोसिन हे एंडॉर्फिन हार्मोनसारखे आहे कारण ते केवळ तुमचा मूड सुधारत नाही तर आनंद देखील वाढवतात.


Health Tips : तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पिता का? आजच व्हा सावधान नाहीतर होतील ‘हे’ आजार


First Published on: May 25, 2022 9:33 AM
Exit mobile version