हिवाळ्यातील सांधेदुखी! हिवाळ्यात सांध्यांची काळजी कशी घ्यावी?

हिवाळ्यातील सांधेदुखी!  हिवाळ्यात सांध्यांची काळजी कशी घ्यावी?

हिवाळ्यातील सांधेदुखी! हिवाळ्यात सांध्यांची काळजी कशी घ्यावी?

डॉ. सिद्धांत एम. शाह, ऑर्थोपेडिक सर्जन
फोर्टिस / एसएल रहेजा हॉस्पिटल

हिवाळ्याला सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून देशभरात थंडीची लाट उसळली आहे. यामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रासही सुरू झाला आहे. हिवाळा हा ऋतू उत्‍साहावर्धक असला तरी काहीजणांसाठी हवेतील गारवा वेदनादायी ठरतो. तर काहीजणांना स्‍नायूदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. हिवाळा व सांधेदुखी यांच्यामध्ये काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

थंडीच्‍या वातावारणामध्‍ये सांधेदुखीपासून आराम कसा मिळवावा?

स्‍वत:ला उबदार ठेवा: योग्‍य कपड्यांच्‍या पेहरावामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहिल आणि सांध्‍यांना उबदारपणा मिळेल त्यामुळे वेदनेपासून आराम मिळू शकतो.

नियमितपणे व्‍यायाम करा

नियमित व्‍यायाम केल्‍याने सांधे उबदार व लवचिक राहण्‍यामध्‍ये मदत होईल. तसेच यामुळे सांध्‍यांचे ल्‍युब्रिकेशन होण्‍यास मदत होते आणि रक्‍तपुरवठा सुधारतात. ज्‍यामुळे वेदनेपासून आराम मिळू शकतो. दुखापती टाळण्‍यासाठी व्‍यायाम करण्‍यापूर्वी वॉर्म-अप करा किंवा नियमित व्‍यायाम करा.

वजनावर नियंत्रण ठेवा

हिवाळ्यादरम्‍यान आहारामध्‍ये बदल आणि कमी शारीरिक व्‍यायामामुळे वजनामध्‍ये वाढ होऊ शकते. यामुळे गुडघ्‍यासारख्‍या महत्त्वाच्‍या सांध्‍यांवर भार येतो, ज्‍यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. पण वजन कमी केल्‍याने वेदनेला प्रतिबंध करण्‍यास मदत होऊ शकते.

हायड्रेशन व संतुलित आहार

हिवाळ्यात घाम येत नसल्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे डिहायड्रेशन होते. म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. थकवा व स्‍नायूदुखी होऊ शकते. हे टाळायचे असल्यास दररोज योग्‍य प्रमाणात पाणी प्यावे. कॅल्शियम व डी जीवनसत्त्व अशा आवश्‍यक पौष्टिक घटकांचे प्रमाण असलेला आरोग्‍यदायी संतुलित आहार घ्यावा. कारण हाडे व सांध्‍यांच्‍या आरोग्‍यासाठी हे दोन्ही जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे.

अधिक प्रमाणात मीठ, साखर, रिफाइन्‍ड कार्बोहायड्रेट्स व प्रक्रिया केलेले फूड्सचे सेवन करणे टाळा, यामुळे सांधेदुखी बळावू शकते. आहारामधून किंवा अपु-या सूर्यप्रकाशामुळे कॅल्शियम व जीवनसत्त्व ड मिळत नसल्‍याचे वाटत असेल तर कॅल्शियम व जीवनसत्त्व ड सप्‍लीमेण्‍ट्ससंदर्भात डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

 गरम पाण्‍याचा शेक घ्‍या

गरम पाण्‍याच्‍या बॅगेमधून किंवा इलेक्ट्रिक हिटिंग पॅडमधून शेक घेतल्‍याने दुखणा-या सांध्‍यांना आराम मिळू शकतो. गरम पाण्‍याने आंघोळ केली तरी स्‍नायू व सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. पण गंभीर दुखापत किंवा चमक भरण्याच्‍या बाबतीत गरम पाण्‍याचा शेक न घेता आईस पॅक्‍सचा वापर करा. लक्षात ठेवा, थंड वातावारणात स्‍नायू व सांधेदुखी होणे स्‍वाभाविक आहे. पण वरील उपायांसह तुम्‍ही या स्थितीवर उत्तमरित्‍या नियंत्रण ठेवू शकता.


हेही वाचा – Winter Tips For Kids : थंडीपासून लहान मुलांचा कसा बचाव कराल? या आहेत टीप्स

First Published on: December 22, 2021 8:27 PM
Exit mobile version