घरताज्या घडामोडीWinter Tips For Kids : थंडीपासून लहान मुलांचा कसा बचाव कराल? या...

Winter Tips For Kids : थंडीपासून लहान मुलांचा कसा बचाव कराल? या आहेत टीप्स

Subscribe

गेल्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आहे.हिवाळ्यात सर्दी-खोकल्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढीस येतात. याशिवाय अनेक आजार या थंडीमध्ये बळावत असतात.या आजराचा जास्त धोका हा १० वर्षांपर्यंतच्या मुलांना जास्त असतो.त्यामुळे हिवाळ्यात बहुतांश लहान मुलांमध्ये अस्वस्थता जाणवू लागते याशिवाय ते खाणे-पिणेदेखील सोडून देतात. थंडीपासून वाचण्यासाठी लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते. त्यामुळे लहान मुलांच्या आहाराबरोबरच त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे थंडीपासून मुलांचा बचाव करण्यासाठी खालील टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे.

  • आहारात भाजी आणि फळांचा समावेश

एखाद्या रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी शरीरात पोषक तत्त्व जाणे आवश्यक आहे.त्यामुळे लहान मुलांना संत्री,स्ट्रॉबेरी,टोमॅटो आणि ब्रोकोली यासारखे व्हिटॅमिन-सी सारखे सिट्रम फळ खाणे गरजेचे आहे.ह्या फळ आणि भाज्या लहान मुलांना सर्दी-खोकल्यासारख्या आजारापासून वाचवू शकते.

- Advertisement -
  • झोपण्याची वेळ वाढवणे

ज्या लोकांची झोप पूर्ण झालेली नसते,त्यांना सर्दी-खोकल्यासारखे आजार होण्याची जास्त शक्यता आहे.ऑस्ट्रेलियामध्ये लहान मुलांकरिता जारी केलेल्या नियमावलीनुसार,लहानग्यांना ११ ते १४ तास झोपणे गरजेचे आहे. तसेच,५ ते १३ वर्षांच्या चिमुकल्यांनी ९ ते ११ तास झोपण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • बाहेर खेळण्यासाठी पाठवावे

थंडीमध्ये बाहेर खेळायला गेल्याने लहान मुले तंदुरुस्त राहू शकतात. खेळण्यामुळे मुलांचा व्यायाम होऊन,रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे लहान मुलांना नेहमीच फिजिकली अॅक्टिव ठेवावे.

- Advertisement -
  • स्वच्छतेच्या चांगल्या सवयी जोपासा

लहान मुलांनी स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगणे गरजेचे आहे.हायजीन ठेवल्याने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत होते. जसे की,साबणाने हात स्वच्छ धुणे आणि, कचरा करु नये अशा अनेक स्वच्छतेच्या सवयी पाळणे गरजेचे आहे.

  • उबदार कपडे वापरा

हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर,जॅकेट,टोपी,मोजे अशा उबदार कपड्यांचा वापर करा.जेणेकरुन, सर्दी – खोकल्यासारख्या आजारापासून लहान मुलांचे संरक्षण होईल.


हे ही वाचा – फडणवीसांनी ७ वर्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला, नवाब मलिकांचा आरोप


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -