महागडी सिल्कची साडी घरी कशी धुवायची?

महागडी सिल्कची साडी घरी कशी धुवायची?

भारतीय महिलांना साडीच्यांचे विशेष आकर्षण असते. काळानुसार विविध फॅशनच्या साड्या बाजारात येत असतात. परंतु सिल्क साड्यांची फॅशन कधीही कमी होत होत नाही. मात्र, सिक्लची साडी धुताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते नाहीतर साडी खराब होऊ शकते. अशावेळी तुम्हाला काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आज आम्ही तुम्हाला सिल्कची साडी घरी कशी धुवायची हे सांगणार आहोत.

महागडी सिल्कची साडी धुताना घ्या ही काळजी

सर्वात आधी करा ‘हे’ काम
सामान्य डिटर्जंटने सतत साडी धुतल्याने साडी लवकर खराब होते. त्यामुळे सिक्लची साडी एकदा नेसल्यानंतर लगेच धुवायची नाही. 4-5 वेळा घालून झाल्यानंतर साडी धुवावी.

स्टेप 1
जर तुम्ही हातानेच सिल्कची साडी धुत असाल तर नेहमी गार पाण्याचा वापर करा. साडी धुण्याआधी एका बकेटमध्ये पाणी भरा आणि त्यात साडी भिजत ठेवा. आता त्यानंतर 2 तासानंतर साडी धुवा.

स्टेप 2
आता दुसऱ्या पाण्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर मिक्स करा, हे पाण्यामध्ये नीट मिक्स झाल्यानंतर साडी 15 मिनिट त्या पाण्यात भिजत ठेवा.

स्टेप 3
आता त्या बकेटमधून साडी बाहेर काढा आणि धुण्यासाठी माइल्ड माइल्ड डिटर्जेंटचा वापर करा.

स्टेप 4
आता तुम्ही सिल्कच्या साडीला डिटर्जेंटच्या पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यात पिळून घ्या आणि साडी सुकायला दोरी वर टाका.

 


हेही वाचा :

महिलांनी फर्टिलिटीसाठी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश

First Published on: January 19, 2023 3:26 PM
Exit mobile version