हिवाळ्यात १० मिनिटात बनवा कोल्ड क्रिम आणि मिळवा मुलायम त्वचा

हिवाळ्यात १० मिनिटात बनवा कोल्ड क्रिम आणि मिळवा मुलायम त्वचा

हिवाळ्यात १० मिनिटात बनवा कोल्ड क्रिम आणि मिळवा मुलायम त्वचा

हिवाळ्याच्या दिवसात आपली त्वचा रूक्ष होते. या दिवसात त्वचेची सर्वात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. ड्राय झालेली त्वचा कोमल आणि मुलायम ठेवण्यासाठी आपण हिवाळ्यात कोल्ड क्रिम लावतो. दुकानात अनेक प्रकारच्या कोल्ड क्रिम उपलब्ध आहेत. त्यापेक्षा आपण घरीच नैसर्गिकरित्या कोल्ड क्रिम तयार करू शकतो. पाहूयात घरच्या घरी आपल्या त्वचेची काळजी घेणारी कोल्ड क्रिम कशी तयार करायची.

कोल्ड क्रिम तयार करण्यासाठी बदामाचे तेल, नारळाचे तेल, व्हिटामिन्स ई कॅप्सुल आणि शिया बटर याची आवश्यकता लागेल. कोल्ड क्रिम तयार करण्यासाठी सर्वात आधी बादामाचे तेल घ्या. जितके बदामाचे तेल घेतले आहे त्याच्या अर्धे नारळाचे तेल घ्या. जर १/२ कप बदामाचे तेल घेतले तर १/४कप नारळाचे तेल घ्या. त्यात दोन टिप्सून शिया बटर मिक्स करा. या सगळ्या गोष्टी एकत्र करून घ्या.

हे संपूर्ण मिश्रण एका छोट्या भांड्यात काढून घ्या. त्यात ३-४ ग्लॉस पाणी घालून ते थोडे गरम करा. गरम पाण्याच्या वाफेने आतील मिश्रणाला वाफ सुटेल. संपूर्ण साहित्य विरघळून जेव्हा एकत्र होईल तेव्हा गॅस बंद करा. नंतर त्यात व्हिटामिन्स ईची एक गोळी टाका. त्यानंतर तुमच्या आवडीचे सुंगधित तेल त्यात मिक्स करू शकता. तयार झालेली क्रिम एका डब्यामध्ये काढून ठेवा. ही क्रिम कधीही काचेच्या डब्यात ठेवू नका. ही क्रिम तुम्ही जवळपास ४ महिन्यापर्यंत वापरू शकता. कोल्ड क्रिममुळे आपली त्वचा मुलायम होते. त्याचबरोबर त्वचेला पोषक घटकही मिळतात.


हेही वाचा – Makar Sankranti 2021 : तिळगूळ खा निरोगी रहा!

 

 

First Published on: January 12, 2021 5:17 PM
Exit mobile version