भारतीय साड्यांचा इतिहास, वेदांबरोबरच महाभारतातही उ्ललेख

भारतीय साड्यांचा इतिहास, वेदांबरोबरच महाभारतातही उ्ललेख

भारतीय संस्कृती, परंपरा यांना जगभऱात विशेष महत्व आहे. खाद्यसंस्कृतीप्रमाणेच भारताच्या प्रत्येक पोशाखाचेही आगळे वेगळे वैशिष्टय आहे. कारण राज्यानुसार तेथील पोशाखही बदलतो. पण असे असले तरी साडी हे एक असे एकमेव वस्त्र आहे जे विविध राज्यातील महिला परिधान करतात. साधारणत सण उत्सवांवेळी जरी भरजरी, नक्षीकाम केलेली साडी नेसण्यास भारतीय महिला प्राधान्य देतात. कारण साडीचा थेट संबध हा हिंदू परंपरा संस्कृतीशी आहे. वेदांमध्येही भारतीय स्त्रियांसाठी साडी हा पोशाख असल्याचा उल्लेख आहे. यामुळे साडी हा भारतीय महिलांचा प्राचीन पोशाख असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय स्त्रियांच्या साडी या पोशाखाबदद्ल जगभरातील स्त्रियांना कुतुहल आहे. कुठलेही शिवणकाम नसलेले ५ ते ६ फूट लांब असलेले लांबलचक कापड साडी म्हणून भारतीय महिला कशा नेसतात याबदद्ल इतर देशांना उत्सुकता असते. पण तुम्हांला माहित आहे का जगभरात सर्वात जास्त परिधान करण्यात येणाऱ्या वस्त्रांच्या यादीत भारतीय साडीचा पाचवा क्रमांक आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात. तसेच या साड्या नेसण्याची पद्धतही राज्यानुसार बदलते हे भारतीय साड्यांचे वैशिष्टय आहे.

साड्यांचे प्रकार

राज्यानुसार साड्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. यात महाराष्ट्राची पैठणी, मध्य प्रदेशची चंदेरी आणि माहेश्वरी साडी, गुजरातची बांधनी, पटोला साडी, राजस्थानची लहरिया साडी,आसाममधली मूंगा सिल्क साडी, तर तमिळनाडूची कांचीवरम, कंडांगी साडी उत्तर प्रदेशची बनारसी सिल्क, तांची, जामदानी साडी, तंजावरची तंजावर सिल्क साडी,कर्नाटकची इरकल साडी, मोलाकलमुरु साडी, उडुपी साडी, केरळातील कासरगोड साडी, कुथमपल्ली साडी, ओडीशाची संबलपुरी बंध साडी, बोमकाई साडी, हबसपुरी साडी, हथकरघा पट्टू साडी, मंगळगिरी साडी, उप्पडा साडी, वेंकटगिरी साडी. यासाऱख्या साड्यांचे विविध प्रकार भारतात बघायला मिळतात.

विशेष म्हणजे महिला सणानुसार त्या त्या रंगाच्या साड्या परिधान करतात. भारतीय साड्यांचा इतिहास तसा जुना आहे. वेदांमध्ये साडी या पोशाखाचा प्रथम उल्लेख करण्यात आला होता. त्याकाळी महिला यज्ञ आणि होम हवनाप्रसंगी साड्या नेसत. वेदांप्रमाणेच महाभारतातही साडीचा उल्लेख आहे. महाभारतात जेव्हा दुशासनाने द्रौपदीचे चिरहरण केले होते तेव्हा भगवान श्री कृष्णाने द्रौपदीच्या साडीचे वार वाढवत तिचे रक्षण केले होते. यामुळे साडी ही फक्त फॅशन किंवा वस्त्र नसून भारताच्या संस्कृतीची ओळख आहे.

 

 

 

 

 

First Published on: February 21, 2023 7:32 PM
Exit mobile version