कोरोनाच्या भीतीने नागरिकांमध्ये वाढतोय ‘इन्सोम्निया’

कोरोनाच्या भीतीने नागरिकांमध्ये वाढतोय ‘इन्सोम्निया’

कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला जातोय की काय, याच्या सततच्या भीतीमुळे जर रात्री झोप लागत नसेल तर त्यात आश्चर्य नाही. बातम्यांचे लक्षवेधी मथळे, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील धूसर होत चाललेल्या सीमारेषा आणि सततची अनिश्चितता यामुळे चिंतेत अधिकच भर पडत जाते. या सर्व विचारांमुळे रात्रीच्या वेळीही डोक्यात मेंदूतील साखळी सुरुच असते किंवा पहाटेच्या वेळी धसक्याने जाग येते हे समजण्यासारखे आहे. अशी लक्षणे दिसत असल्यास तो नक्कीच ‘इनसोम्निया’ म्हणजे निद्रानाशाच्या वाढलेल्या शक्यतेचे सूचक आहे. ‘इन्सोम्निया’ या शब्दाला ‘कोरोनासोम्निया’ देखील म्हणले जाते. कोरोनासोम्निया म्हणजे पॅनडेमिकमुळे निर्माण झालेल्या ताणतणावांमुळे तयार झालेली स्थिती. पण याला विषाणू नव्हे तर भोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरते.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेसने अनियत पद्धतीने निवडलेल्या १५० लोकांची पहाणी केली. या संशोधनातून असे दिसून आले की, १५० पैकी २५-३०% लोकांना नॉन-रिस्टोरेटिव्ह झोपेचा त्रास होता. त्याचप्रमाणे कोव्हिड-१९ च्या लॉकडाऊनचा झोपेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाशी आणि रात्रीच्या झोपेचे प्रमाण व दर्जा या दोघांशीही संबंध असल्याचे देशातील काही सर्वोत्कृष्ट मानसोपचारतज्ज्ञ आणि न्युरोलॉजीस्ट्सनी मे २०२० मध्ये केलेल्या आणखी एका देशांतर्गत संशोधनातून दिसून आले. हे बदल प्रामुख्याने भावनिक लक्षणांच्या वाढलेल्या प्रमाणाशी संबंधित आहेत. जगभरातही याच प्रकारचा प्रवाह दिसून आला. याबद्दल माहिती देताना कन्सल्टन्ट पल्मोनोलॉजिक व स्लीप मेडिसीन तज्ञ डॉ. अंशु पंजाबी यांनी यासाठी काही उपाय दिले आहेत.

१. ‘वाइंड डाऊन’ची वेळ निश्चित करा
२. मोबाइल फोन्स आणि लॅपटॉप्सपासून दूर रहा
३. झोपण्यापूर्वी कॅफेनयुक्त पेये आणि अल्कोहोल घेतल्याने जागरण होते.
४. बिछान्यात असताना आपले घड्याळ तपासू नका
५. या सर्व प्रयत्नांनतरही तुम्हाला रात्री मध्येच कधीतरी जाग आलीच, तर बिछान्यातून बाहेर पडा. दुस-या आरामशीर, शांत खोलीत जा आणि वाइंड-डाऊनच्या वेळेत तुम्ही जे करत होता तेच करा. शरीर पुन्हा एकदा झोपेला येणे हे अंतिम लक्ष्य समोर ठेवा.

कोरोनासोम्नियाचा अनुभव तात्पुरता असू शकतो, याविषयी आपल्या फिजिशियनशी बोलणे महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला काही सोपे उपाय सांगून किंवा गरज भासल्यास औषधे देऊन तुमच्या झोपेचे बिघडलेले वेळापत्रक दुरुस्त करण्यासाठी मदत करू शकतील.


हे वाचा- बदलत्या मोसमात चुकूनही करु नका ‘या’ चूका, करावा लागेल आजाराचा सामना

First Published on: March 10, 2021 7:32 PM
Exit mobile version