झटपट ‘मक्याची इडली’

झटपट ‘मक्याची इडली’

झटपट 'मक्याची इडली'

इडली सर्वांनाच आवडते. मात्र, इडली बनवताना फार मेहनत देखील घ्यावी लागते, अगदी आदल्या दिवसापासून त्याची तयारी करावी लागते. त्यामुळे गृहिणींना फार त्रास होतो. मात्र, जर तुम्ही मक्याची इडली बनवलात तर तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. झटपट तुम्ही इडली बनवून खाऊ शकता. चला तर पाहूया या झटपट इडलीची रेसिपी.

साहित्य

कृती

एका तव्यावर २ चमचे तेल टाकून गरम करा आणि मोहरीची फोडणी द्या. आता चनादाळ आणि उडिद डाळ रंग येई पर्यंत भाजून घ्या. त्यानंतर आलं, हिरवी मिर्ची आणि कढीपत्ता थोडा भाजून घ्या. आता मक्याचे पीठ थोडा वेळ भाजा. त्यानंतर भाजलेले मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून यामध्ये मीठ, दही आणि कोथिंबिर एकत्र करा आणि पाणी टाकून तांदळ्याच्या इडलीप्रमाणे पातळ मिश्रण बनवा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे घोळून १० मिनिटे ठेवून द्या. १० मिनिटामध्ये हे मिश्रण सेट होऊन. आता या मिश्रणामध्ये ईनो साल्ट टाका आणि हे मिश्रण इडली पात्रात टाकुन द्या. पंधरा मिनिटांनंतर इडली पात्रा बाहेर काढा. अशाप्रकारे चटपटीत मक्याची झटपट इडली तयार.

First Published on: May 26, 2020 6:00 AM
Exit mobile version