Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthInternational Yoga Day 2023 : 21 जून रोजीच का साजरा केला जातो...

International Yoga Day 2023 : 21 जून रोजीच का साजरा केला जातो योग दिवस? ही आहे यंदाची थीम

Subscribe

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून (International Yoga Day 2023)  रोजी साजरा केला जातो. या दिवशी जगभरात योगाशी संबंधित अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. देश-विदेशातील लोकही या दिवशी योगा करतात. योग हा भारताने संपूर्ण जगाला दिलेला अमूल्य वारसा आहे. निरोगी शरीरासाठी योगा खूप महत्वाचा आहे. योगाच्या माध्यमातून तुमच्या शरीरात अनेक चांगले बदल दिसून येतात. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी योगासन खूप चांगले मानले जाते. याचं निमित्ताने आज आम्ही तुम्हाला योग दिवसाचा इतिहास आणि महत्त्व सांगणार आहोत.

काय आहे योग दिवसाचा इतिहास?

कोरोनाच्या काळानंतर योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अनेक संसर्गांपासून लढण्यासाठी लोक योगासने करू लागले. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाची सुरुवात 2015 पासून करण्यात आली. या वर्षीच पहिल्यांदाच योग दिन जगभरात साजरा करण्यात आला. यावेळी संयुक्त महासभेत जगातील सर्व देशांना योग दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्ताव स्वीकारकरुन संयुक्त राष्ट्र महासभेने तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्याची घोषणा केली. त्यानंतर 2015 पासून जगभरात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरु करण्यात आला.

- Advertisement -

21 जून रोजीच का साजरा केला जातो योग दिवस?

21 जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्यामागे एक कारण आहे. 21 जून ही तारीख उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. भारतीय परंपरेनुसार, उन्हाळ्याच्या संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणायन होतो. सूर्य दक्षिणायनाचा काळ आध्यात्मिक सिद्धी मिळविण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

- Advertisement -

काय आहे यंदाची थीम?

यंदाच्या योग दिनाची थीम ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणजे- पृथ्वीचं आपलं कुटुंब आहे. ही थीम पृथ्वीवरील सर्व लोकांच्या आरोग्यासाठी योगाच्या उपयुक्ततेचे महत्त्व सांगते.

 


हेही वाचा :

International Yoga Day 2023 : वजन कमी करायचंय? ‘ही’ 5 योगासने करतील मदत

- Advertisment -

Manini