ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचंय? मग खळखळून हसा

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचंय? मग खळखळून हसा

खळखळून हसल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते. तसेच हसल्याने शरिरीक आणि मानसिक आरोग्य देखील उत्तम राहते. हसल्याने शरीरामध्ये पॉजिटिव हॉर्मोन तयार होतात. ज्यामुळे ब्लड शुगर लेवल देखील नियंत्रणात राहते. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट्स नेहमी हसण्याचा आणि आनंदी राहण्याचा सल्ला देतात. जेणेकरुन तुमचे आरोग्य देखील चांगले राहिल.

खळखळून हसण्याचे आरोग्यासाठी आहेत गुणकारी फायदे


जर तुम्हाला कंबर दुखी किंवा स्पॉन्डिलाइटिसचा त्रास असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने हसा, तसेच दिवसातून 10 मिनिटांपर्यंत वॉक करा.


जे लोक रोज खळखळून हसतात त्यांचा बीपी नियंत्रणात राहतो. कारण हसल्यामुळे रक्त वाहिन्यांचे कार्य सुधारते आणि शरीरामध्ये रक्ताचा प्रभाव नीट होतो.


डिप्रेशनपासून सुटका होण्यासाठी दररोज विनोदी व्हिडीओ, विनोदी चित्रपट पाहा. ज्यामुळे तुम्ही खळखळून हसू शकाल.


हसल्यामुळे शरीरामध्ये इन्डोफ्रिन नावाचे हार्मोन तयार होतात जे पुर्ण शरीराला सुखद अनुभव देतात.


हेही वाचा :

सावधान! सकाळच्या नाश्त्यामध्ये कधीही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

First Published on: October 14, 2022 4:58 PM
Exit mobile version