पोषक मुगाचे बिरडे

पोषक मुगाचे बिरडे

mug birde recipe

आपल्या सगळ्यांनाच रोज तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. अशातच आतापर्यंत आपण मुगाची भाजी आणि मुगाच्या भज्या खाल्या असतीलच. चला तर आज पाहुया मुगाचे बिरडे.

साहित्य –

१ वाटी मोड आलेले मूग
१ कांदा बारीक चिरलेला,
१ चमचा हळद,
१ चमचा धणे, जिरे पावडर, हिंग, मोहरी
१ वाटी खोबऱ्याचे वाटण
आपल्या आवडीनुसार गूळ
चवीनुसार मीठ
कोकम, कढीपत्ता

कृती-

सर्वप्रथम भांड्यात तेल टाकणे, तेल व्यवस्थित तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंग टाकणे. त्यावर चिरलेला कांदा टाकणे. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात हळद, तिखट, धणे, जिरे पावडर टाकणे आणि व्यवस्थित परतून घेणे. त्यानंतर त्यात मूग घालून पुन्हा चांगले परतून घेणे आणि पाणी टाकून त्यावर झाकण ठेवणे. मूग चांगले शिजल्यावर त्यात चवीनुसार गूळ आणि खोबऱ्याचे वाटण ३ ते ४ आमसुले घालणे. त्यानंतर उकळी आणणे आणि त्यावर छान कोथिंबीर पेरून पोळी किंवा भाताबरोबर मुगाचे बिरडे वाढावे.

First Published on: February 25, 2020 7:00 AM
Exit mobile version