आजारापासून मुक्त व्हायचे आहे; करा हे उपाय

आजारापासून मुक्त व्हायचे आहे; करा हे उपाय

आपल्याकडे सगळी संपत्ती आहे. मात्र आरोग्य उत्तम नसेल तर तुम्ही निरोगी जीवन जगू शकत नाही. बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खूपवेळ बसून काम करण्याची पद्धत यामुळे आरोग्यावर चुकीचा परिणाम होता. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणांमाचा सामना करायचा नसेल तर हे उपाय जरूर करा. रोजच्या सवयीत हे काही बदल केलेत तर नेहमी तंदुरूस्त आणि हेल्दी राहण्यास मदत होईल.

१. सकाळी लवकर उठा

सकाळी लवकर उठल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होईल तसेच एक्स्ट्रा एनर्जी देखील शरिरात जमा होईल. तसेच लवकर उठून कोवळ्या उन्हात तुम्ही फिरण्यास गेलात तर हाडांच्या समस्या उद्भवणार नाही. सकाळच्या वेळी असणाऱ्या हवेतील ऑक्सिजन आरोग्यास लाभदायक ठरते.

२. पचनक्रिया उत्तम ठेवा

जर तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य हवे असेल तर तुमची पचनक्रिया सुदृढ असणे तेवढेच आवश्यक असते. जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे टाळा. जेवल्यानंतर काही वेळ चालल्यास अन्न पचणास मदत होईल.

३. अर्धा तास योगासाधना करणं आवश्यक

सकाळी उठल्यानंतर काही वेळ व्यायाम, योगा करणे आवश्यक आहे. शरिर उत्तम राहण्यासाठी कमीत कमी ३० मिनिटे व्यायम करणं आवश्यक आहे. योगसाधना किंवा मेडिटेशन तुम्हाला शारिरीक आणि मानसिक स्वास्थ उत्तम राखण्यास मदत होईल.

४. खाण्याच्या पिण्याच्या सवयींवर लक्ष

गरजेपेक्षा अधिक खाणं हे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे शारिरीक हालचालींसाठी आपले डाएट योग्य असणे आवश्यक असते. अशावेळी कमी आणि हलके अन्न खा. योग्यरित्या पचलेले अन्न तुमचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करेल. यामुळे अतिरिक्त फॅट वाढण्यावर नियंत्रण मिळेल.

५. सकाळच्य़ा नाश्तात फळांचा समावेश

सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्या. नाश्त्यात व्हिटॅमीन, प्रोटीन, फायबर, ओमेगा ३ घटक असणाऱ्या फळांचा समावेश करा. यामध्ये फळांचा जास्त समावेश असावा.

First Published on: November 16, 2019 6:30 AM
Exit mobile version