वय आणि प्रसंगानुसार अशी लावा परफेक्ट लिपस्टिक 

वय आणि प्रसंगानुसार अशी लावा परफेक्ट लिपस्टिक 

Lipsticks

लिपस्टिक लावल्याने चेहरा खुलून दिसतो.त्यामुळे लिपस्टिक ही स्त्रीयांची आवडती कॉस्मेटिक आहे. परंतु, कोणत्याही प्रसंगी, कुठल्याही चेहर्‍यावर कोणत्याही रंगाच लिपस्टिक लावलं तर ते शोभून दिसत नाही. त्यासाठी रंगाची निवड अगदी परफेक्ट असायला हवी.

गोरा रंग 

जर तुमच्या त्वचेचा रंग गोरा असेल तर ब्राईट कलरची लिपस्टिक लावा.हे रंग चेहर्‍याला अधिक खुलवतात.

कॉलेजला जाणार्‍या मुलींसाठी

जर तुम्ही कॉलेजला जात असाल तर पिंक शेड किंवा ब्राईट रेड लिपस्टिक निवडा. हे रंग तुमच्या चेहर्‍याला अधिक फ्रेश लूक देतील.

पार्टीला जाताना

कोणत्याही समारंभाला किंवा पार्टीला जाताना क्लासिक रेड रंगाची लिपस्टिक अधिक शोभून दिसते. हा रंग चेहर्‍याचे तेज वाढवण्यास मदत करतो.

२५- ३५ वर्षांच्या स्त्रियांसाठी

वय २५-३५ वर्ष दरम्यान असेल तर या वयाच्या स्त्रियांना कोणताही रंग शोभून दिसतो. तरीसुध्दा भडक रंगाची लिपस्टिक वापरण्याचे टाळावे.

First Published on: November 20, 2018 5:30 AM
Exit mobile version