मकरसंक्रांत स्पेशल – यंदा हळदीकुंकवाला द्या हटके ‘वाण’

मकरसंक्रांत स्पेशल – यंदा हळदीकुंकवाला द्या  हटके ‘वाण’

यंदा हळदीकुंकवाला द्या हटके 'वाण'

मकरसंक्रांतीला तिळगुळ, काळे कपडे परिधान करणे त्याचबरोबर हळदी कुंकवाचाही विशेष उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळतो. मात्र, बऱ्याचदा हळदीकुंकूवाला वाण म्हणून काय द्याचे, असा प्रश्न दरवर्षी महिलांना सतावतो. बऱ्याचदा स्वस्तात मस्त अशा प्लास्टिकच्या वस्तू दिल्या जातात. मात्र, त्या स्वस्त असल्यातरी देखील प्लास्टिकमध्ये वाढ होते आणि ते प्लास्टिक नष्ट करणे फार कठीण जाते. पण यंदा थोडासा वेगळा विचार करूया आणि हळदी कुंकवाचा आनंद लुटूया.

फालुदा

बऱ्याचदा खाण्याच्या वस्तू वाण म्हणून दिल्या का त्याचा अधिकच फायदा होतो. सध्या बाजारात फालुद्याचे तयार असे पाकिट मिळते. विशेष म्हणजे लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांना फालूदा आवडतो. त्यामुळे यंदाच्या हळदीकुंकूवाला तुम्ही फालुद्याचे पाकिट नक्की देऊ शकता.

पॉपकॉन

लहान मुलांना पॉपकॉन केव्हाही दिले तरी त्यांची खाण्याची तयारी असते. त्यामुळे प्रत्येकवेळी मोठ्यांना काय आवडेल तेच दिले पाहिजे, असे नाही. त्यामुळे तुम्ही यंदा लहान मुलांच्या आवडीचे पॉपकॉन पाकिट देऊ शकता. विशेष म्हणजे हे तुम्हाला घरी बनवायचे असून तुम्हाला ज्यावेळी खावेसे वाटेल त्यावेळी तुम्ही बनवून खाऊ शकता.

चायनीज सूप

सध्या थंडीचे दिवस असून बऱ्याच जणांना गरमागरम खावेसे वाटते. तर अनेक मंडळी हॉटेल्समध्ये जाऊन चायनीज सूपचे सेवन करता. त्यामुळे जर यंदा तुम्हाला काहीतरी युनिक द्याचे असले तर हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारात रेडिमेड, असे वेगवेगळ्या प्रकारचे सूप दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा तुम्ही सूपचे पाकिट वाण म्हणून नक्की देऊ शकता.

मंच्युरियन

चायनीजचा प्रकार सर्वांनाच आवडतो. त्यामुळे मंच्युरियन हा एक उत्तम आणि चांगला असा पर्याय आहे. बाजारात मंच्युरियनचे तयार पीठ मिळते. त्या पीठापासून तुम्ही झटपट आणि गरमागरम असे घरातल्या घरात मंच्युरियन नक्की करु शकता. त्यामुळे हे वाण देखील तुम्ही देऊ शकता.

लोणच

स्वस्तात मस्त असे लोणच्याचे पाकिट तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. कारण लोणचे हे सर्वच घरात सर्रास वापरले जाते. त्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे.

First Published on: January 17, 2020 6:00 AM
Exit mobile version