Wednesday, May 8, 2024
घरमानिनीKitchenMakar Sankranti 2024 : अशी बनवा भोगीची भाजी

Makar Sankranti 2024 : अशी बनवा भोगीची भाजी

Subscribe

संक्रांतीच्या आदल्यादिवशी भोगी असते. संक्राती एवढेच भोगीला देखील महत्व आहे. या दिवशी महाराष्ट्रात आणि इतर काही राज्यांमध्ये घराघरात भोगी साजरी केली जाते. भोगीची भाजी, बाजरीची तीळ भाकरी आणि मुगाची किंवा उडदाची खिचडी यादिवशी आवर्जून केली जाते. आज आम्ही तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 3 वांगी चिरलेली
  • 1/2 वाटी वाटाणा
  • 1/2 वाटी हिरवे हरभरे
  • 1/2 वाटी भिजवलेले कच्चे शेंगदाणे
  • 1/2 वाटी ओलं खोबरं
  • 1/4 वाटी कोथिंबीर
  • 1/4 वाटी तेल
  • 2 चिरलेले गाजर
  • 1 चिरलेला कांदा
  • 1 चमचा तीळ
  • 2 चमचे लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • हळद
  • हिंग
  • 1 चमचा गरम मसाला पावडर

कृती :

Bhogichi Bhaji Recipe » Dassana's Veg Recipes

  • सर्वप्रथम सर्व भाज्या एकत्र करुन एकदा स्वच्छ धुवून घ्या.
  • आता एका भांड्यात तेल तापवा, त्यात कांदा परतून त्यात हिंग, हळद घालून पुन्हा एकदा परतवा.
  • त्यानंतर त्यामध्ये भाज्या घालून परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरे घालून छान एकजीव करा.
  • गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या.
  • शेवटी कोथिंबीर घाला आणि बाजरीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा : 

Makar Sankranti 2024 : ‘भोगी’ सणाचे महत्त्व काय?

- Advertisment -

Manini