Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenMakar Sankranti 2024 : असे बनवा तिळगुळाचे लाडू

Makar Sankranti 2024 : असे बनवा तिळगुळाचे लाडू

Subscribe

तीळ गरम असतात त्यामुळे ते थंडीत मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मकर संक्रातीचा सण देखील एकमेकांना तीळ देऊन साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण तीळाचे लाडू बनवतात. आज आम्ही तुम्हाला याच लाडवांची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1/2 किलो तिळ
  • 1/2 किलो चिक्कीचा गूळ
  • 1 ते दीड वाटी शेंगदाण्याचे जाडसर कूट
  • 1 वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
  • 1/2 वाटी चण्याची डाळ
  • 1 चमचा वेलची पूड
  • 1-2 चमचे तूप

कृती :

Til Ke Ladoo Recipe - Sesame Ladoo Recipe by Archana's Kitchen

  • सर्वप्रथम 1/2 किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिक्कीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे.
  • गूळाचा पाक करावा. सतत ढवळत राहावे. गूळ पूर्ण पातळ झाला की थोड्या वेळाने तो फेसाळतो.
  • त्यानंतर पाक व्यस्थित झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा आणि एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा ‘टण्णं’ असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
  • पाक झाला कि त्यात भाजलेले तिळ, शेंगदाण्याचे जाड कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याची डाळ, वेलची पूड घालून निट ढवळावे आणि गरम असतानाच लाडू वळावेत.
  • लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे, ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

हेही वाचा : Makar Sankranti 2024 : संक्रांतीसाठी लुसलुशीत तीळ पोळी

- Advertisment -

Manini