Sunday, May 5, 2024
घरमानिनीKitchenझटपट बनवा उपवासाचा केक आणि ढोकळा

झटपट बनवा उपवासाचा केक आणि ढोकळा

Subscribe

श्रावणाच्या काळात उपवास करताना दररोज खायला काय करायचं असा प्रश्नच महिलावर्गापुढे असतो. साबुदाणा, भगर असे पदार्थ बनविले जातात, मात्र सतत हे पदार्थ खाल्ल्याने कंटाळा येतो. पण उपवास करताना पोटही भरायला हवे, मग अशावेळी काहीतरी वेगळ पण टेस्टी काय करायच यावर महिला वर्गाने शक्कल लढवत भगर, राजगिऱ्याचे पिठ, दही, तुप यांचा वापर करत उपवासाचे केक, ढोकळा तयार केली असून सध्या श्रावणाच्या काळात उपवासाच्या पदार्थांमध्ये या पदार्थांना उपवास करणाऱ्या खवैय्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. या पदार्थांची रेसिपी जाणून घ्या.

 

- Advertisement -

उपवासाचा केक बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

1 कप भगर आणि राजगिरा पीठ, 2/3 कप साखर, 2 टे.स्पू. तेल किंवा तूप, 4 टे.स्पू. दही, 1 टे.स्पू. बेकिंग पावडर, 1/2 टे.स्पू. सोडा, 2 टे.स्पू. दूध पावडर, 1/2 टे.स्पू. दूध.

कृती –

भगर राजगिरा पीठ बारिक करून घ्या. त्यानंतर त्यात पिठी साखर आणि दही घालावे. यासह बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, 50 ग्रॅम बटर याबरोबर तुम्हाला आवडाणारा फ्लेवर उदा. मिक्स फ्रूट किंवा व्हॅनिला इसेन्स घालून हे सर्व मिश्रण एकत्र करावे. मिश्रण छान एकत्र झाल्यावर त्यात थोडी मिल्क पावडर घालावी.

- Advertisement -

मिश्रण मिक्स करतांना थोड थोड दूध घालावे. छान मिश्रण तयार झालं की केक टिन मध्ये टाका. त्यावर छान गार्निशींग करण्यासाठी आपल्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता घालावे. यानंतर 150 डिग्रीवर 45 मिनिटे ओव्हनमध्ये केक बेक करायला ठेवा. 45 मिनीटानंतर तुमचा उपवासाचा केक तयार…

उपवास ढोकळा बनविण्यासाठी साहित्य –

1 कप भगर, 2 टे.स्पू. साबुदाणा, अर्धा कप दही, आल मिरचीची पेस्ट, मीठ, तेल, खायचा सोडा, अर्धा कप पाणी.

कृती –

2 चमचे साबुदाणा मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्यानंतर बारिक केलेला साबुदाणा, भगर, दही घालून आल आणि मिर्चीचा ठेचा एकत्र करा. यात मिश्रण एकत्र करण्यासाठी गरजेप्रमाणे पाणी घालावे. एकत्र केलेले मिश्रण 15 ते 20 मिनिटे झाकून बाजूला ठेवा. 15 ते 20 मिनीटानंतर त्या मिश्रणात थोडा खायचा सोडा आणि चवीपुरत मीठ घालावे. अशा प्रकारे उपवासाचा ढोकळा बनविण्यासाठीचे आपल पीठ तयार आहे. त्यानंतर 1 भांडे घेवून त्याला आतून थोडा तेल लावून घ्या. त्यात तयार केलेलं पीठ घालून 20 मिनिटे मध्यम आचेवर ते वाफवून घ्या. नंतर त्याला मस्त फोडणी द्या. आपला उपवासाचा चविष्ट ढोकळा तयार आहे.

- Advertisment -

Manini