घरदेश-विदेशManipur Violence: मणिपूर घटनेप्रकरणी विरोधी पक्षाकडून मोदी सरकारवर टीका

Manipur Violence: मणिपूर घटनेप्रकरणी विरोधी पक्षाकडून मोदी सरकारवर टीका

Subscribe

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्र करुन धिंड काढल्याच्या प्रकरणी सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली गेली आहे. ही घटना समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. मोदी सरकार ‘ऑल इज वेलचा दिखावा’ कधी बंद करणार असा सवाल ही उपस्थितीत केला जात आहे. तसेच भाजपचे स्री शक्तीचे दावे पोकळ असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. या घटनेवर विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी असे म्हटले की, पंतप्रधानांना दोन महिन्यानंतर आठवले की मणिपुरमध्ये हिंसाचार होत आहे. आता तर पीएम यांना व्हिडिओवर बोलावेच लागले, कारण तो व्हायरल झाला आहे. तेथे नरसंहार होत आहे. न्याय तेव्हाच होईल जेव्हा तेथील मुख्यमंत्र्यांना हटवले जाईल आणि पीएम सीबीआय तपासाचे आदेश देतील.

- Advertisement -

राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, लज्जेने मान खाली गेली पाहिजे. आपल्या देशात असे काही होत आहे. तसेच पीएम मोदी यांनी आज सुप्रीम कोर्टाने टीप्पणी केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असा सवाल उपस्थितीत केला की, गृहमंत्री यावर शांत का आहेत? बेटी पढ़ाओ बेटी बचाओचे काय झााले? अशा पद्धतीने सुरक्षित राहणार का मुली?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, पंतप्रधानांनी जे मौन धरले होते त्यामुळे मणिपुरला अराजकतेच्या दिशेने ढकले गेले आहे. भारताच्या विचारांवर हल्ला केला जात आहे. भारत शांत बसणार नाही. आम्ही मणिपूर जनतेसोबत आहे. आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. शांतता हाच केवळ पुढे जाण्याचा मार्ग आहे.

- Advertisement -

टीएमसीने सुद्धा संताप व्यक्त केला असून केंद्र सरकारला असा प्रश्न विचारला आहे की, तपास यंत्रणांना आणि आयोगाला मणिपूर मध्ये पाठवण्यास कोण थांबवत आहे? डब्लूसीडी मंत्री अद्याप या प्रकरणावर शांत का आहेत? भाजपावर हल्लाबोल करत टीएमसीने असे म्हटले की, जर मणिपूर महिलांसाठी न्याय सुनिश्चित करु शकत नाही तर भाजपचा नारी शक्तीचा दावा पोकळ आहे.

तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवास यांनी या घटनेला लज्जास्पद आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. भारतीय समाजात असे विकृत वागणे सहन केले जाणार नाही. मणिपूरची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भारतात अशा गुन्हेगारांना जागा देऊ नये.


हेही वाचा- Manipur Violence: ‘त्या’ अत्याचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा आम्ही करू, सरन्यायाधीशांचा सरकारला इशारा

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -