घरमहाराष्ट्रBMC कोविड घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

BMC कोविड घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

Subscribe

मागील महिन्यात कोविड घोटाळ्याच्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज या घोटाळ्याच्या प्रकरणी मोठी कारवाई करत सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : कोरोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून तपास करण्यात येत होता. मागील महिन्यात कोविड घोटाळ्याच्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज या घोटाळ्याच्या प्रकरणी मोठी कारवाई करत सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात अनेक छापेमारी आणि चौकशा केल्यानंतर ईडीने सुजीत पाटकर आणि त्यांच्या डॉ. किशोर बिचुले या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ठाकरे गटात खळबळ उडाल्याचे बोलले जात असून संजय राऊत यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. (Sanjay Raut’s close associate Sujit Patkar arrested in BMC Covid scam case)

हेही वाचा – 2 हजारांची बॉडी बॅग BMCने खरेदी केली 6800ला, कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं कुणाला?

- Advertisement -

ईडीकडून आज (ता. 20 जुलै) ही कारवाई करत सुजीत पाटकरांना अटक करण्यात आली. यानंतर आता त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुजीत पाटकर यांची लाईफ लाईन हॉस्पिटल नावाची कंपनी असून या कंपनीमार्फत मुंबईमधील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.

या प्रकरणाचे ट्वीट देखील किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वातच नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला होता.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांची अनेकदा चौकशी देखील करण्यात आली होती. तसेच त्यांच्या मुंबई येथील घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. या छापेमारीमध्ये ईडीला अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर सापडले होते.

जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. या कंपनीने जे डॉक्टर आणि संबंधित यंत्रणा दाखवली ती यंत्रणाच अस्तित्वात नव्हती, असा आरोप ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात केला आहे. तसेच आता या प्रकरणी ईडीकडून आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -