Saturday, May 11, 2024
घरमानिनीRecipeRecipe : झटपट बनवा ब्रेड पोहे

Recipe : झटपट बनवा ब्रेड पोहे

Subscribe

ब्रेड पोहे हा पोह्यांचा एक प्रकार आहे जो ब्रेड आणि काही मसाल्यांपासून बनवला जातो. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ही रेसिपी काही मिनिटांत बनवू शकता.

साहित्य :

  • 4 ब्रेडचे तुकडे
  • 2 चमचे तेल
  • 1/4 चमचा हिंग
  • 5-6 कढीपत्त्याचे पाने
  • 2 चमचे लाल तिखट
  • 1 वाटी वाटाणे (उकडलेले)
  • भाजलेले शेंगदाणे
  • 1 चमचा हळद
  • मीठ चवीनुसार
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • किसलेला नारळ

कृती :

Bread Poha Recipe, How to Make Quick & Tasty Bread Poha at Home

- Advertisement -
  • कढईत थोडे तेल टाकून गरम करून घ्यावे.
  • तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि लाल तिखट घालावे आणि त्यात वाटाणे घालून ते शिजवून घ्यावे.
  • त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे घालावे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यावे.
  • हळद आणि मीठ टाकल्यानंतर ब्रेडचे तुकडे घालून ते चांगले फ्राय करावे.
  • ब्रेडचे तुकडे घातल्यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडून घ्यावे.
  • शेवटी त्यात हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर घालावी.
  • ब्रेड पोहे तयार झाल्यावर किसलेला नारळ घालून सर्व्ह करावे.

हेही वाचा : 

Recipe : थंडीत बनवा आल्याचा गुळांबा

- Advertisment -

Manini