घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोरी थांबेना! वर्षभरात १६१ छापे; २३५ जणांना अटक

लाचखोरी थांबेना! वर्षभरात १६१ छापे; २३५ जणांना अटक

Subscribe

जिल्हानिहाय छाप्यांची आकडेवारी: नाशिक-६२, नगर-३४, धुळे-१८, नंदूरबार-१५, जळगाव-३२

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे, असे फलक शासकीय कार्यालयात दिसत असले तरी उत्तर महाराष्ट्रात लाचखोरी थांबलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यातील पथकांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालवधीत टाकलेल्या तब्बल १६१ ठिकाणी छाप्यात २३५ जण लाच घेताना अडकले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ६२, अहमदनगर जिल्ह्यातील ३४, धुळे १८, नंदुरबार १५ आणि जळगाव ३२ सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईत २३५ अधिकार्‍यांमध्ये नाशिक परिक्षेत्रात वर्ग १ चे १४, वर्ग २ चे २५, वर्ग ३ चे १२६, वर्ग ४ चे १४, इतर लोकसेवक १७ व खासगी इसम ३९ यांचा समावेश आहे.

नाशिक परिक्षेत्रात या वर्षी ०५ केसेस न्यायालयात शाबीत झाल्या. त्यामध्ये नाशिक घटकात २, नगर घटकात २ व नंदुरबार घटकात २ या प्रमाणे शाबीत निकाल लागले आहेत. यामध्ये राजु पुणा रामोळे, शाखाधिकारी, लघुपाटबंधारे उप विभाग, सटाणा, जि. नाशिक. यांचे वरील सन २०१९ मधील लाच मागणी कारवाई न्यायालयाने त्यांना दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा व १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी व अंमलदार यांनी केली.

- Advertisement -

 

नाशिक परिक्षेत्र राज्यात पहिल्या स्थानी

नाशिक परिक्षेत्र १६१ सापळा कारवाई करून राज्यात सापळा कारवाईत पहिल्या स्थानी आहे. वर्षभरात २ कोटी १५ लाख ९ हजार ३६० रुपये लाच स्विकारण्याचे सापळा कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

सर्वात मोठ्या रकमेची कारवाई
२०२३ मध्ये नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्वात मोठी कारवाई नाशिक घटकतील पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत व त्यांचे टीमने नगर घटकात महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ विभागातील सहा अभियंता अमित गायकवाड व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याचे केली. अमित गायकवाड यास १ कोटी रुपये लाचेची रक्कम स्विकरतांना पकडण्यात आले.

वर्षभरातील उल्लेखनीय कारवाया

  • नाशिक घटकाने भूमी अभिलेख विभागातील जिल्हा अधिक्षक महेश शिंदे व लिपोकावर ५० हजार रुपयांची लाच स्विकाल्याची कारवाई, सिन्नरचे सहायक निबंधक रणजित पाटील व लिपीक विरनारायण यांना २० लाख रुपये लाच स्विकारताना पकडण्यात आले.
  • सहकार खात्यातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे जिल्हा निबंधक सतीश खरे यांना ३० लाख रुपये लाच स्विकारतांना पकरण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांचेवरील कारवाई, तसेच शिक्षण विभागातील मोठी कारवाई म्हणजे शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांना ५५ हजार रुपये स्विकारताना पकडण्यात कारवाई करण्यात आली.
  • दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांचे वर ४० लाख रुपये लाच मागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली. नाशिकचे तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांना घराचे पार्कीगमध्ये १ कोटी ५ लाख रुपये लाच स्किारतांना पकडण्यात येवुन कारवाई करण्यात आली.
  • राज्य वस्तू व सेवा कर अधिकारी जगदीश पाटील यांचे वर कारवाई केली. नगर घटकातील वैदयकीय अधिकारी डॉ. वैशाली सूर्यवंशी, कोपरगाव तहसिलदार विजय बोरूडे यांचेवर कारवाई तसेच विशेष लेखा परिक्षक किसन सागर यास एक लाख स्विकारतांना पकडण्यात आले. नंदुरबार घटकात महेश पाटील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा यास ४३ लाख रुपये लाचेची मागणी करून त्यांना त्यापैकी ३ लाख ५० हजार रुपये घेताना पकडण्यात आले होते.
  • धुळे विभागत म.रा.वि.वि मर्या कंपनीचे व्यवस्थापक अमर खोंडे व उप व्यवस्थापक मनोज पगारे यांना दोन लाख रुपये स्विकारताना पकडण्यात आले. जळगाव विभागात पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस नाईक तुषार पाटील यांचे वर ५ लाखांची मागणी करून ३ लाख स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
  • जळगाव जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर विसपुतेवर ४ लाख स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. सहागटविकास अधिकारी रविंद्र सपकाळे व विस्तार अधिकारी पदमाकर आहीरे यांना ५ लाखांची लाच रक्कम स्विकारतांना पकण्यात आले.
  • शिक्षण विभागातील सुनिता धनगर यांच्यावर कारवाई केल्यानंतर तपासात उघड चौकशी करून त्यांचेवर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नगर घटकात १ अन्य भ्रष्टाचाराचा गुन्हा व नाशिक घटकात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे वर अन्य भ्रष्टाराचा गुन्हा नोंदविण्यात आला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -