थंडीत अनेकजण आवळ्याचा मुरांबा बनववता. आज आम्ही तु्म्हाला आल्याचा गुळाम्बा कसा बनवायचा कसा हे सांगणार आहोत.
साहित्य :
- आलं
- गूळ
कृती :
- आलं स्वच्छ धुवून घ्या. त्याची सालं काढून किसणीवर किसून घ्या.
- एका वाटीला दीड वाटी या प्रमाणात बारीक चिरलेला गूळ मिक्स करा. अर्धा तास तसंच ठेवा.
- आल्याला पाणी सुटले की आता पातेलं गॅसवर ठेवून मिश्रण गरम करा.
- गूळ विरघळला की थेंब डिशमध्ये टाकून पसरत नाही ना पाहा.
- आता हा गुळांबा खाली उतरून गार झाला की काचेच्या बरणीत भरून ठेवा.
- थंडीत दररोज 1-2 चमचे याचे सेवन करा.