आत्तापर्यंत तुम्ही आंबा, केळी, सफरचंद यांसारख्या फळांपासून तयार केले जाणेरे अनेक पदार्थ खाल्ले असतील. आज आम्ही तुम्हाला सीताफळापासून बासूंदी कशी तयार करावी हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 1 लिटर दूध
- 1 सीताफळ
- 7-8 भिजवलेल्या बदामाचे काप
- 1/2 चमचा वेलची पूड
- 3 वाटी साखर
कृती :
- सिताफळाच्या बिया काढून त्याचा गर बाजूला वाटीत काढून ठेवावा.
- 1 लिटर दूध घेऊन ते 1/2 लिटर होईपर्यंत मंद आचेवर आटवून घ्यावे.
- त्यानंतर त्यात भिजवलेले बारीक बदाम, वेलची पूड आणि पाऊण किलो साखर घालून मिश्रण एकजीव करावे.
- पुन्हा एकदा बासुंदी आटवून घेऊन थंड झाल्यानंतर त्यामध्ये एका सीताफळाचा गर घालून थोडावेळ घोटून घ्यावे.
- अशाप्रकारे चविष्ट बासुंदी घरच्या घरी तयार करता येईल.
- Advertisement -
हेही वाचा :
Recipe: गूळ पापडीच्या वड्या
- Advertisement -
- Advertisement -