Thursday, February 22, 2024
घरमानिनीचांदीचे दागिने काळे पडलेत? मग 'या' ट्रिकने चमकवा

चांदीचे दागिने काळे पडलेत? मग ‘या’ ट्रिकने चमकवा

Subscribe

सोन्याच्या दागिण्यांइतकीच चांदीचे दागिने घालण्याची देखील अनेक महिलांना खूप हौस असते. यामध्ये चांदीचे पैंजण आणि जोडवी तर विवाहीत महिला आवर्जुन घालतात. असं म्हणतात, चांदीच्या दागिण्यांचा वापर केल्याने आपले मन आणि डोकं शांत राहतं. शिवाय यामुळे कुंडलीतील चंद्र ग्रह देखील मजबूत होतो. मात्र, सतत हे दागिने वापरुन ते काळे पडतात. प्रत्येकवेळी दागिने चमकावण्यासाठी सोनाराकडे जाण्यापेक्षा तुम्ही काही घरगुती उपायांनीही दागिने चमकवू शकता.

‘या’ उपायांनी चमकवा चांदीचे दागिने

How to Clean Silver Jewelry in a Matter of Minutes

- Advertisement -
  • आंबट दही,स हळदीचे मिश्रण दागिने चमकविण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी एका वाटीत 25 ग्रॅम आंबट दह्यात 5 ग्रॅम हळद मिसळावी. या मिश्रणात दागिने भिजत ठेवा. साधारणपणे अर्धा तास दागिने ठेवून त्यानंतर टूथब्रश व पाण्याच्या सहाय्याने दागिने स्वच्छ करून घ्या. दागिने पूर्वीप्रमाणे झळाळू लागतील.
  • धूळ, दूषित हवा, माती यांच्या संपर्कात आल्यास चांदीचे दागिने लवकर काळे पडतात. चुना हा एक असा घटक आहे, जो चांदीच्या दागिन्यांची गेलेली चमक परत आणतो. थोड्या प्रमाणात चुना घेऊन तो पाण्यात मिसळा. त्यानंतर त्याचा लेप चांदीच्या दागिन्यांवर लावा. साधारण तासाभराने दागिन्यांवरील चुना सुकेल. त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने दागिन्यांवरील चुना स्वच्छ करावा. त्यानंतर पाण्याच्या सहाय्याने दागिने धुवून स्वच्छ करा. चांदीचे दागिने पूर्वीप्रमाणे चमकू लागतील.

How to Clean Sterling Silver Necklaces | LoveToKnow

  • बटाटे उकडलेल्या पाण्यात चांदीचे दागिने काही तास ठेवून त्यानंतर पाण्याने स्वच्छ केल्यास चांदीच्या दागिन्यांची झळाळी पुन्हा येईल.
  • टूथपेस्टच्या मदतीने देखील तुम्ही काळे दागिणे स्वच्छ करु शकता. यासाठी चांदीच्या दागिन्यांवर टूथपेस्टचा थर लावा आणि काही वेळ तसाच ठेवा नंतर टूथब्रशच्या मदतीने हलक्या हाताने चांदीचे दागिने घासा.

हेही वाचा : Kitchen Tips : रुचकर जेवणासाठी स्पेशल टिप्स

- Advertisment -

Manini