Tuesday, May 21, 2024
घरमानिनीचांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी टिप्स

चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी टिप्स

Subscribe

लग्नसमारंभात सोन्याच्या दागिन्यांना जितकं महत्व आहे तितकंच चांदीच्या दागिन्यांनाही. महिलांना चांदीचे दागिने घालायला आवडतात. जसे की, पायातील पैंजण, जोडवी आदी. चांदीचे दागिने खूप सुंदर आणि बजेट फ्रेंडली असतात. इतकंच नाहीतर यात वैविध्यही दिसून येतं. मात्र, चांदीचे दागिने खरेदी करताना काही जणांकडून क्षुल्लक चुका होतात किंवा बनावट चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. यासाठी चांदीचे दागिने खरेदी करताना काही गोष्टीची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

- Advertisement -

दागिने खरेदी करण्यासाठी टिप्स –

हॉलमार्फ –

- Advertisement -

सहसा सोन्याचे दागिने विकत घेताना हॉलमार्क चेक करण्यात येतो. त्याचप्रमाणे चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्क तपासून घेणे गरजेचे असते. अनेक जणांना तर चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्क असतो ही गोष्ट माहीतही नसते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. खऱ्या चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क किंवा स्टॅम्प असतो तो त्यामध्ये असलेल्या चांदीचे प्रमाण दर्शवितो. स्टर्लिंग चांदीचा सर्वात सामान्य हॉलमार्क म्हणजे 92.5 म्हणजेच दागिना स्टर्लिंग चांदीपासून बनवलेला आहे. जर तुम्हाला चांदीच्या दागिन्यांवर असा हॉलमार्क दिसल्यास यावरून असे समजा की, दागिना 92.5% शुद्ध चांदीपासून बनलेला आहे.

क्वालिटी –

चांदीचे दागिने खरेदी करताना दागिन्यांची क्वालिटी चेक करणे खूप महत्वाचे असते. जर दागिन्यांची कारागिरी चांगली नसेल तर दागिन्यांवर तुम्हाला खडबडीत कडा, असमान सोल्डरिंग असे विविध प्रकार दिसून येतात. यासाठी तुम्ही कायम उच्च दर्जाची क्वालिटी असणारे दागिने खरेदी करायला हवेत कारण असे दागिने जास्त काळ टिकतात.

डिझाईन –

मार्केटमध्ये चांदीच्या दागिन्यांमध्ये विविध डिझाईन मिळतात. त्यामुळे चांदीच्या दागिन्यांची निवड करताना थोडा विचारपूर्वक करावा. तुमचा लूक, पर्सनल स्टाईल आणि आवड लक्षात घेत क्लासिक, कंटेम्पररी किंवा अन्य डिझाइन्स तुम्ही निवडायला हव्यात.

ऍलर्जी –

चांदीच्या दागिन्यांबाबतीत ही सर्वात मोठी टीप आहे. अनेकदा चांदीच्या दागिने बनवायला इतर धातू देखील वापरले जातात. यामुळे काही लोकांना त्याची ऍलर्जी होऊ शकते. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर हायपोएलजेनिक चांदीचे दागिने किंवा उच्च शुद्धतेचे दागिने निवडण्याचा सल्ला देण्यात येतो.

 

 

 

 


हेही पहा : चुकूनही वापरू नये दुसऱ्याचे मंगळसूत्र

 

- Advertisment -

Manini