Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenReceipe : अशी बनवा गाजराची टेस्टी खीर

Receipe : अशी बनवा गाजराची टेस्टी खीर

Subscribe

गाजर म्हटलं की, अनेक जण गाजराचा हलवा करतात. पण, जर तुम्हाला गाजराची एखादी नवी रेसिपी ट्राय करायची असेल तर गाजराची खीर नक्की करा.

साहित्य :

  • 1 कप किसलेले गाजर
  • 1 लीटर दूध
  • 1 कप तूप
  • 1 चमचा साखर
  • गरजेनुसार काजू
  • गरजेनुसार मनुका
  • वेलची पूड

कृती :

Carrot Kheer | Carrot Payasam | Gajar ki Kheer - Rumki's Golden Spoon

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 कप तूप चांगले गरम करुन घ्या. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये 7-8 काजू चांगले फ्राय करुन घ्यावे.
  • त्यानंतर फ्राय केलेले काजू बाजूला काढून घ्यावेत. त्यानंतर त्यात गाजराचा किस चांगला परतवून घ्यावा. नंतर पॅनमध्ये एक लिटर दूध मिक्स करावे.
  • नंतर दूध आणि गाजर सारखे परतून घ्यावे. जेणेकरुन खीर पॅनला चिकटणार नाही. हे सारे मिश्रण 8-10 मिनिटांसाठी चांगले उकळू द्या.
  • खीर उकळून घट्ट होऊ द्या. आता त्यामध्ये चार चमचे साखर मिक्स करा. साखर विरघळली आहे की नाही, याची खात्री करून घ्या.
  • त्यानंतर खिरीमध्ये फ्राय केलेले काजू, मनुका आणि चिमूटभर वेलची पूड मिक्स करा.
  • पुन्हा एकदा सर्व सामग्री ढवळून घ्या, अशाप्रकारे गरमागरम गाजराची टेस्टी खीर तयार सर्व्ह करा.

हेही वाचा :

Receipe : शिळ्या भातापासून बनवा टेस्टी रेसिपी

- Advertisment -

Manini