फेशियलमुळे चेहराच नाही तर मनही होत रिलॅक्स

फेशियलमुळे चेहराच नाही तर मनही होत रिलॅक्स

पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतो तेव्हा तुम्हाला सुस्ती येते का? यावेळी तुम्ही तणाव वाढेल अशा गोष्टी विसरुन रिलॅक्स होता. तसेच उत्तम झोप ही लागू शकते. खरंतर स्किन केअर किंवा मसाजचा थेट परिणाम हा तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो ते तुम्हाला माहितेय का? त्वचेची वेळोवेळी काळजी घेतल्यास लाइफस्टाइलमध्ये बदल होतो.

आपल्या शरिरारचा फार महत्वाचा भाग म्हणजे आपली त्वचा. स्किन हेल्दी असेल तरच तुम्ही स्वस्थ दिसता. स्किन केअरमुळे पोर्स, डाग-पिंपल्स किंवा डार्क सर्कल्स ही कमी होतात. त्याचसोबत हानिकारक युवी किरण आणि टॅनिंग पासून बचाव करण्यासाठी मदत होते. एक उत्तम आणि योग्य स्किनकेयर रुटीनमध्ये क्लिजिंग, एक्सफोलिएशन, टोनिंग, मॉइस्चराइजिंग, सन प्रोटेक्शन क्रिम आणि फेशियलचा यामध्ये समावेश करावा.

एका संशोधनानुसार, एक उत्तम स्किनकेअरमुळे दैनंदिन आयुष्यात तणाव कमी होऊ शकतो. स्किन केयरचा प्रकार हा सुद्धा सेल्फ केअरमध्ये मोडतो. जर रुटीनमध्ये नाइट स्किन केअरचा समावेश असेल तर यामुळे तणाव कमी होऊन आराम मिळतो. चमकदार त्वचा असणारी लोक अधिक कॉन्फिडेंट असतात. ते अधिक आनंदी दिसतात.

तसेच जी लोक व्यायाम, हेल्दी आहार आणि स्किन केअर रुटीन फॉलो करत नाहीत त्यांचे मूड स्विंग होणे, एकटेपण वाटणे, उदास राहणे अशा समस्यांचा सामना करतात. दररोज तुम्ही मॉइस्चराइजिंग व्यायामाप्रमाणे काम करते. यामुळे तुमचे मनातील विचार शांत आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यास मदत होईल. याचसोबत काही मानसिक आजारांपासून दूर राहतो.

खरंतर नियमित रुपात स्किनची काळजी घेतल्यास तर मेंदूवर ही निगेटिव्ह विचारांचा प्रभाव होत नाही. मसाजमुळे ब्रेन केमिकल्स ट्रिगर होतात, त्यामुळे मूड उत्साहित आणि शांत राहण्यास मदत होते.


हेही वाचा- Skin care : बजेट फ्री असलेले ‘हे’ 5 बेस्ट फेस पॅक ; नक्की ट्राय करा

First Published on: May 14, 2023 3:30 PM
Exit mobile version